तुर्भे उड्डाणपुलावरील तोडक कामामुळे प्रदुषणात वाढ

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये प्रदुषण पसरविणाऱ्या सायन-पनवेल मार्गावरील तुर्भे येथील उड्डाणपुलावरील चुकीच्या पध्दतीने होणाऱ्या तोडकामामुळे नवी मुंबई मध्ये प्रदुषण पसरत आहे. त्यामुळे सदरचे तोडक काम तातडीने थांबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे प्रववते रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

दरम्यान, यासंदर्भातील निवेदन रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका आयुवत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता (चेंबूर) यांना देखील दिले असून या त्यांनाही तुर्भे उड्डाणपुलावर चुकीच्या पध्दतीने होत असलेले तोडक काम थांबविण्याची विनंती करण्यात आली आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे येथील उड्डाणपुलावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे तोडकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराच्या माध्यमातून सुरु आहे. सदरचे तोडकाम चुकीच्या पध्दतीने सुरु असल्यामुळे नवी मुंबईतील प्रदुषणात वाढ झाली आहे. या तोडक कामामुळे सभोवतालच्या परिसरातील नवी मुंबईकरांच्या आणि तेथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांच्या आणि प्रवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर प्रकाराचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे रविंद्र सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

ज्या ठिकाणी तोडकाम सुरु असेल, तो भाग जमिनीपासून काही अंतरावर पत्रे टाकून, ग्रीन नेट वापरुन अथवा अन्य उपाययोजना करुन तेथील काळजी घेणे आवश्यक असते. जेणेकरुन सभोवतालाच्या परिसरात धुळीचे लोट पसरुन श्वसनाचे आ़ढो अन्य विकार होऊ नयेत याला प्राधान्य देणे आवश्यक असते. पण, सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे उड्डाणपुलावर  तोडकाम करताना पिलर आणि अन्य ठिकाणीही विचित्र परिस्थिती झालेली आहे. या तोडकामामुळे प्रदुषण वाढीस लागले असून तातडीने याठिकाणी पाहणी अभियान राबवावे. तसेच या अभियानात आम्हालाही सहभागी करुन घ्यावे, जेणेकरुन सदर समस्येचे गांभीर्य आम्हाला आपल्या निदर्शनास आणून देता येईल. त्याअनुषंगाने तुर्भे उड्डाणपुलावर सुरु असलेले तोडक काम तातडीने थांबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.

पर्यावरणाची हानी होणार नाही, प्रदुषणामध्ये वाढ होणार नाही याची काळजी घेऊन तोडकाम करणे आवश्यक आहे. पण,  मार्गदर्शक तत्वांनुसार कामाला सुरुवात होणार नसेल तोपर्यत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे उड्डाणपुलावर तोडक काम करण्यास परवानगी देऊ नये. तसेच सुरु असलेले काम तातडीने थांबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. -रविंद्र सावंत, प्रववते-नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी