चैत्र नवरात्रोत्सव मध्ये वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान

ठाणे: ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने आयोजित जांभळी नाका मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुरु असलेल्या ‘चैत्र नवरात्रोत्सव-२०२४ भक्ती-कला महोत्सव'च्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सादर करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर मधील वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाखाप्रमुख महेश ढोमणे, ‘श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ'चे अध्यक्ष दिनकर पाचंगे, ‘माऊली सेवा मंडळ ठाणे'चे अध्यक्ष ह. भ. प. विलास फापाळे, ‘वारकरी संप्रदाय'चे सुधीर शेलार, अशोक घोलप, किशोर साळुंखे, दादाराम जाधव, महादेव पार्टे, गणेश पाटील, वासुदेव पांचाळ, माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक तसेच ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर शहरामधील वारकरी संप्रदायातील वारकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कारमूर्तीः ठाण्यातील ह.भ.प. चंद्रकांत क्षीरसागर, ह.भ.प. गोकुळ महाराज बुचडे, ह.भ.प. वासुदेव भिकाजी पांचाळ, ह.भ.प. अजित निकम, ह.भ.प. पुंडलिक खंडू मोरे, ह.भ.प. रेखा काशिनाथ कंटे, ह.भ.प. गोरक्षनाथ कृष्णा फडतरे, ह.भ.प.शोभाताई इंळवे, ह.भ.प. अनिताताई चुंबळे, नवी मुंबई येथील ह.भ.प. हनुमंत महाराज गोळे, ह.भ.प. सचिन महाराज विराळे, ह.भ.प. वसंत सखाराम मिस्त्री, ह.भ.प. सुभाष कोंडीबा आरोटे, ह.भ.प. रमेश महाराज दळवी, ह.भ.प. सटवा यादव तोडारे, ह.भ.प. जयेश शंकर म्हात्रे, मिरा-भाईंदर ह.भ.प. अर्चना कृष्णा पारेकर, ह.भ.प. अलका राजेंद्र दुसगे, ह.भ.प. सुमित्रा हरिभाऊ मुळे, ह.भ.प. भागीरथी बद्रीनाथ बहीर, ह.भ.प. वनिता वचीष्ट पौळ, आदि मान्यवरांचा समावेश आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मान्सूनपूर्व कामांसाठी केडीएमसी सज्ज