नवी मुंबई आयुक्त डॉ. कैलास शिंदे ॲक्शन मोडवर

 नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका आयुवतपदाची सुत्रे हाती घ्ोतल्यानंतर डॉ. कैलास शिंदे ॲक्शन मोडवर आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर त्यांनी महापालिका शिक्षण विभागाच्या शाळांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यापाठोपाठ आयुवत डॉ. शिंदे यांनी ८ एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विभागातील कामकाजाचे स्वरुप जाणून घ्ोत महापालिकेच्या कामकाजात डिजीटलायझेशन, ई-ऑफिस पध्दत आणि कॉम्पॅक्टर सिस्टीम आणून कामकाजात सुधारणा करण्याच्या मौलिक सूचना प्रशासनाला दिल्या. विशेष म्हणजे तळमजल्यावर महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्याचे आदेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. कैलास शिंदे यांची राज्य शासनाने १५ दिवसांपूर्वी नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घ्ोतल्यानंतर डॉ. शिंदे यांनी सर्व विभाग प्रमुखांकडून त्यांच्या विभागांची माहिती जाणून घ्ोतली. त्यांनतर त्यांनी सर्वप्रथम आरोग्य विभागाकडे मोर्चा वळवून सार्वजनिक रुग्णालयांना भेट देत त्याठिकाणी सुरु असलेल्या कामकाजात अनेक बदल करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागानंतर आयुक्त शिंदे यांनी महापालिकेच्या शाळांना भेटी देऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण विभागाला सूचना केल्या. त्यानंतर ८ एप्रिल रोजी डॉ.कैलास शिंदे यांनी महापालिका मुख्यालयातील विविध विभागांना भेटी देत कामकाजाची पाहणी केली. या भेटी दरम्यान वेगवेगळ्या विभागातील कामकाजाचे स्वरुप जाणून घ्ोत त्यात सुधारणेच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या.
 

गेले दोन आठवडे आयुवत डॉ. व्ौÀलास शिंदे यांनी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती करुन घ्ोतली. त्यांनी महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सेवेची पाहणी केली. रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जा उत्तम राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे त्यांनी सूचित केले. याशिवाय रुग्णांना रुग्णालयामार्फतच औषध पुरवठा करणे, रुग्णांच्या नोंदी डिजीटल स्वरुपात ठेवण्यासोबतच रुग्णालयाचे पेपरलेस कामकाज करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. व्ौÀलास शिंदे यांनी यावेळी दिले.  
 

आरोग्य व्यवस्थेच्या पाहणीनंतर आयुक्त डॉ. शिंदे यांनी आपला मोर्चा महापालिका शिक्षण विभागाच्या कामकाजाकडे वळवितानाच, काही शाळांना भेटी देऊन तेथील शिक्षण व्यवस्थेची पाहणी केली. महापालिकेच्या शिरवणे येथील शाळा क्रमांक-१५ ला भेट दिल्यानंतर त्यांनी शाळा विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम असल्याने शाळा इमारती मधील अंतर्गत आणि बाह्य परिसराच्या स्वच्छतेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांची प्रत्यक्ष पाहणी करुन त्यामध्येही सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  
 

यावेळी आयुवतांनी मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या ॲक्वा मशीन्सचीही पाहणी केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आधुनिक स्वरुपातील डिजीटल शिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने वर्गांमध्ये असलेले डिजीटल बोर्ड कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या शिक्षण पूरक साहित्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नियमित वापर करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शाळा भेटी दरम्यान दिल्या.
 

दुसरीकडे महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर वैद्यकीय कक्ष स्थापन करुन त्यामध्ये डॉक्टर आणि एक रुग्णवाहिका व्यवस्था करण्यात यावी. नागरिकांसाठी प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था करावी. तशा प्रकारचे फलक प्रदर्शित करावे. तसेच कामकाज पेपरलेस होण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने गतीमान कार्यवाही करावी आणि जलद डिजीटलायझेशन करुन घ्यावे, असे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. यावेळी आयुक्त शिंदे यांनी कार्यालयीन स्वच्छतेकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना देत फाईलींची मांडणी, नस्ती बांधलेले ग्ीे, कागदपत्र ठेवण्याच्या पध्दती अशा बाबींमध्ये आवश्यक सुधारणा करुन नीटनेटकेपणाला प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 कंटेनर पलटी; ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी