कल्याणच्या स्वागतयात्रेत घुमला जयघोष हिंदुत्वाचा आणि दिसून आला प्रचंड जल्लोष कल्याणकरांचा

कल्याणात प्रथमच निघाल्या तीन शोभायात्रा

कल्याण : गुढीपाडव्यानिमित्त कल्याणात यंदा न भूतो अशी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा निघालेली पाहायला मिळाली. यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशन कडे यंदाच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागतयात्रेचे यजमानपद आले होते. त्यांनी कल्याणातील मराठी बांधवांसह गुजराथीजैनपंजाबीदक्षिण भारतीयउत्तर भारतीय समाजालाही या स्वागतयात्रेमध्ये सहभागी करून घेतल्याने त्याला सर्वसमावेशक असे स्वरूप प्राप्त झाले होते. तर यावेळी मुख्य स्वागतयात्रेसोबत आणखी दोन भव्य शोभायात्राही कल्याण पश्चिमेत निघाल्याने कल्याणच्या काना कोपऱ्यात हिंदुत्वाचा जयघोष आणि कल्याणकरांचा जल्लोष दिसून आला. जागोजागी काढण्यात आलेल्या भव्य रांगोळ्या आणि विविध सामाजिक संस्थांकडून या स्वागत यात्रेचे पुष्पवृष्टीत स्वागत केले जात होते.

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातून कल्याणच्या या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. ज्यामध्ये ढोल ताशा पथकमहिलांचे लेझीम पथक यासोबतच टाळ मृदुंगाच्या निनादात जय श्रीरामचा गजर पाहायला मिळाला. तर या शोभायात्रेत कल्याण डोंबिवली महपालिकेतर्फे मतदान जनजागृतीपरविद्युत विभागातर्फे सौर ऊर्जा जनजागृतीपर चित्ररथासह पर्यावरण संरक्षणअवयवदानआरोग्य आदी जनजागृतीपर चित्ररथ सहभागी झाले होते. रामबागसहजानंद चौकछ्त्रपती शिवाजी महाराज चौकदेवी अहिल्याबाई होळकर चौकटिळक चौकपारनाकालालचौकी मार्गे फडके मैदानात पोहोचली.

कल्याण पश्चिमेत यंदा मुरबाड रोड येथील मुख्य स्वागत यात्रेसोबतच खडकपाडा साईचौक आणि उंबर्डेआधारवाडी येथूनही दोन भव्य शोभायात्रा निघाल्या होत्या. उंबर्डे येथून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजबांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. खडकपाडा साई चौकातून निघालेली ही शोभायात्रा आणि उंबर्डे येथून निघालेली शोभायात्रा या दोन्ही स्वागतयात्रा वासुदेव बळवंत फडके मैदानात मुख्य स्वागतयात्रेत जोडल्या गेल्या. त्यावेळी फडके मैदानात अक्षरशः भगवी लाट निर्माण झाल्याचे दिसून आले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या 25 फुटी महागुढीला 125 ढोल आणि 40 ताशांच्या माध्यमातून अप्रतिम असे अभिवादन करून ही भव्य स्वागतयात्रा विसर्जित करण्यात आली.

यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलकल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईरइंडीयन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकरस्वागतयात्रा समिती समन्वयक डॉ. प्रशांत पाटीलभिवंडी लोकसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रेकल्याण संस्कृती मंचचे ॲड. निशिकांत बुधकरअतुल फडके, केडीएमसीचे संजय जाधवकार्यकारी अभियंता प्रशांत भागवतॲड. जयदीप हजारे यांच्यासह कल्याणातील हजारो मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नववर्षाचं जल्लोषात स्वागत !