रबाळे एमआयडीसी भागातील सर्व्हिस रोड गायब

ऐरोली : रबाळे एमआयडीसी भागातील अनेक भूखंडांवर, सर्व्हिस रोड, गटारे यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन कब्जा केला आहे. विशेष म्हणजे भूखंड धारक व्यावसायिकांनी सर्व्हिस रोडवर अनधिकृत व्यवसाय चालू करताना गटारावर देखील स्लॅब  टाकून त्या गटारावरील भागाचाही ताबा घेतला आहे.  याशिवाय भूखंड धारक व्यावसायिकांनी रबाळे एमआयडीसी मधील सर्व्हिस रोडवर देखील अतिक्रमण केले आहे.

भूखंड धारक व्यावसायिकांनी रबाळे एमआयडीसी भागातील सर्व्हिस रोडवर गाळे बांधून, वाढीव बांधकाम करुन संपूर्ण सर्व्हिस रोड काबीज केला आहे. या प्रकाराची संपूर्ण माहिती असूनही एमआयडीसी अधिकारी त्यांच्या हद्दीतील सर्व्हिस रोडवर बेकायदा बांधकामे करणाऱ्या भूखंड धारक व्यावसायिकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नाचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसरीकडे रबाळे एमआयडीसी भागातील छोट्या-मोठ्या उद्योजकांनी दोन-तीन फुटाचे वाढीव बांधकाम केले किंवा पत्रा शेड लावली तर त्यावर तत्काळ कारवाई केली जाते. मग, सर्व्हिस रोड आणि गटारावर अतिक्रमण करणाऱ्या भूखंड धारक व्यावसायिकांवर एमआयडीसी प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही?, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे शहरातील नवीन बांधकामांना महापालिकेचे पाणी वापरण्यास मनाई