ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई
पनवेल ः लोकसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत ३३-मावळ लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आचारसंहिता पथकाची बैठक ४ एप्रिल रोजी महापालिका मुख्यालयात पथक प्रमुख अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, गट विकास अधिकारी संजय भोये, सनियंत्रण अधिकारी तालुका कृषी अधिकारी शरद गीते, सहाय्यक पथक प्रमुख सहाय्यक प्रशासन अधिकारी गुलाब बळीराम यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. यावेळी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याबाबत ६ पथकातील पोलीस अधिकारी तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, ३३-मावळ यांच्या सचनेनुसार ६ भरारी पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या भरारी पथकांमार्फत १८८-पनवेल विधानसभा मतदार संघात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. सदर पथकांमार्फत बेकायदेशीर रोकड हस्तांतरण, मद्याचे वाटप, अवैध मार्गाने आणि मतदारांना प्रलोभन ठरतील अशा तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, संशयास्पद वाहनांची तपासणी करणे, वस्तू जप्त करणे, पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम करण्यात येणार आहे.
आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याची माहिती सिवीजल (ण्घ्न्न्घ्उघ्थ्) ॲपद्वारे करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आजवर या ॲपद्वारे १० तक्रारी प्राप्त झाल्या असून सदर सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आचारसंहितेचे पालन न केल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सदर बैठकीत भरारी पथकातील अधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच अधिकाऱ्यांचा अडचणी, शंका यावर देखील चर्चा करण्यात आली. भरारी पथकाचे काम व्यवस्थितरित्या करण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद अधिकाऱ्यांनी दिला.