छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
यावेळी मोठ्या मताधिक्याने निवडणून येईन – खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विश्वास
डोंबिवली : २०१४ साली अडीच लाखांच्या फरकाने मला लोकांनी मला निवडून दिले होते.२०१९ ला साडे तीन लाखांच्या फरकाने कल्याण लोकसभेची निवडणूक जिकली होती.आता २०२४ ला ही मोठया मताधिक्याने निवडणून येईन असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवार १ तारखेला डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत माजी नगरसेवक व गटप्रमुखाची भेट घेतली.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकारी व शिवसैनिककांशी बोलताना अति आत्मविश्वास बाळगू नका आणि सतर्कतेने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.