पनवेल महापालिका, विसपुते कॉलेजच्या माध्यमातून टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा

पनवेल : माझी वसुंधरा ४.० उपक्रमांतर्गत पनवेल महापालिका आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानातून नुकतेच टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सदर कार्यक्रमास डी. डी. विसपुते कॉलेजच्या प्राचार्या ॲड. डॉ.सीमा कांबळे, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, पर्यावरण विभागाचे  रजनीकांत पट्टण, महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांनी पर्यावरणाचे संवर्धन-संरक्षण या विषयावर माहिती देत आजपर्यंत महाविद्यालयाच्या माध्यमातून केलेल्या पर्यावरण विषयक कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कल्पना शक्तीच्या जोरावरती तयार केलेल्या टाकाऊ पासून  टिकाऊ वस्तुंचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती डुंबरे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ. प्रितेश वाढे आणि प्रा. विनायक लोहार यांनी केले. सदर स्पर्धेसाठी प्रा. नेहा म्हात्रे आणि प्रा. मनिषा सुतार यांनी सहकार्य केलेॅ. यावेळी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी रोजच्या वापरातील टाकाऊ प्लास्टिक बाटल्या, वस्तू, फळांसोबत येणारी आवरणे यापासून सुंदर अशा वस्तू तयार केल्या होत्या. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर करा तक्रार