आ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात भव्यदिव्य महाआरती संपन्न

नवी मुंबई :  श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवी मुंबई सांस्कृतिक, कला, क्रीडा महोत्सव-२०२४'च्या अनुषंगाने अयोध्या मधील श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे अवघा बेलापूर मतदार संघ राममय झाला होता. यावेळी संपूर्ण सीबीडी-बेलापूर मध्ये श्रीराम नामाचा जयघोष करण्यात आला. अयोध्या मधील श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात सीबीडी येथील सुनिल गावस्कर मैदानामध्ये भव्यदिव्य अशी एकमेव महाआरती साजरी करण्यात आली.

 गेली २७ वर्षे ‘श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था'च्या माध्यमातून समाजपयोगी, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, संगीत यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी अयोध्या मधील प्रभू श्री रामाच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वात सीबीडी, सेवटर-२ येथील सुनील गावस्कर मैदानामध्ये भव्यदिव्य अशा प्रभू श्रीराम, प्रभू लक्ष्मण आणि माता जानकी यांची उपस्थित हजारो महिला आणि नवदाम्पत्य यांच्या हस्ते दिवे लावून एकमेव महाआरती करुन दीपोत्सव साजरा करण्यात आला, अशी माहिती ‘श्री गोवर्धनी संस्था'च्या संस्थापक-अध्यक्षा आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

प्रभू श्रीरामाची महाआरती करणयाचा मान शिवाजी श्रीपती खामकर आणि सौ. सुमन शिवाजी खामकर तसेच सुजित शिंदे आणि सौ. सुषमा शिंदे यांना मिळाला. त्यामुळे संपूर्ण सीबीडी श्रीराममय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच महाराष्ट्र बालगंधर्व भूषण अशीमिक कामठे प्रस्तुत राम जन्म कथा आणि नृत्य नाटिका या कलाकारांनी सीबीडीवासियांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर भगवान श्रीरामांची महती सांगणारी गाणी, भजन यांचे देखील आयोजन करण्यात आले होते. सुनिल गावस्कर मैदानामध्ये भगवे झेंडे, प्रभू श्रीरामाचे बॅनर तसेच व्यासपीठावर केला जाणारा श्री राम नामाचा गजर यामुळे संपूर्ण सीबीडीमधील वातावरण भक्तीमय झाले होते.

दरम्यान, प्रभू श्रीरामाच्या महाआरती नंतर श्रीराम भवतांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच ‘मेरे घर राम आये है...' या गण्यावर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत सर्वच राम भक्तांनी आणि नागरिकांनी ठेका धरला.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वाशीमध्ये ‘मराठी विश्व संमेलन'ला सुरुवात