खेलो खेलो इंडिया महिला पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना चॅम्पियनशिप पदक
नवी मुंबई : अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमेन्स पिंच्याक सिलॅट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी २६ सुवर्णपदकासह चॅम्पियनशिप चषक पटकावला. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया व इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन यांच्या मान्यतेने २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पिंच्याक सिलॅट असोसिएशन ऑफ गोवा आयोजित पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमेन्स पिंच्याक सिलॅट लीग क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दमण दिव आणि यजमान गोवा अशा ६ राज्यातील ३०० महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत एकूण २६ सुवर्ण १८ रजत १२ कांस्य पदके मिळवून ५६ पदकांची कमाई करत खेलो इंडिया वुमन लीग मध्ये महाराष्ट्र संघाने चॅम्पियनशिप चषक पटकावून अव्वल स्थान अबाधित ठेवले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ २३ फेब्रुवारी रोजीकिशोर प्रकाश येवले-राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन, तारिक जरगरजनरल सेक्रेटरी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन तसेच डॉ चंद्रशेखर शेट्टी-आमदार बीचोलियम गोवा, डॉ शेखर सालकर-अध्यक्ष पिंच्याक सिलॅट असोसिएशन गोवा पदाधिकाऱ्याच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक अंशुल कांबळे, टीम मॅनेजर ओमकार अभंग यांनी कार्यभार सांभाळला. महाराष्ट्र संघाला साहेबराव ओव्हाळ, संकेत धामंडे, नागेश बनसोडे, पोर्णिमा तेली, तृप्ती बनसोडे, आकाश धबडगे, योगेश पानपाटील, सुहास पाटील, अमोल कदम, नागेश काळभोर यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेमध्ये विजयी संपादन केलेल्या खेळाडूंची निवड खेलो इंडिया पिंच्याक सिलॅट वुमन्स लीग राष्ट्रीय स्पर्धा ज्या छत्तीसगड (सब ज्युनिअर), महाराष्ट्र (ज्युनिअर) व जम्मू काश्मीर (सीनियर) वयोगट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.