अनेक जिल्ह्यामध्ये अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी; बदली न करता निवडणूक प्रक्रियेला बाधा
पामा ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत उंचावले भारताचे नाव
नवी मुंबईः पामा ग्लोबलद्वारे आयोजित २२ व्या पामा ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. व्हिएतनाममध्ये पार पडलेल्या या स्पर्धेसाठी पामा इंडिया या संस्थेने भारतातून विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी निवडले होते आणि त्या यादीत नवी मुंबई ‘जुई क्रिएशन व अक्षरशिल्प ABACUS (वाशी, सीवूड व खारघर)'चे ११ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताला अभिमानास्पद स्थान मिळवून दिले. या स्पर्धेत २८ देशांतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. भारतामधून ७४ विद्यार्थ्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती.
या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन विद्यार्थिनी वैश्विनी चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. स्वरा खतावकर, प्राज्य घरत, सेजल पाटील आणि आरुष घोरपडे यांनी दुसरा क्रमांक, रूहीका जेजुरकर, वितात्य घरत - तिसरा क्रमांक, अभीर संभेराव, दर्श काळे, आर्या जगताप, समिद्रीता ढेब - तिसरा क्रमांक यांनी मिळवून भारताचे नाव उज्ज्वल केले. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धीमत्तेचा आणि चातुर्याचा योग्य ठिकाणी उपयोग करण्याची संधी देते. या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षक विशाखा काळे व कविता पिलाणे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढली.