बेलापूर येथे वृक्षारोपण सोहळा संपन्न

नवी मुंबई : एस.आर.दळवी फाउंडेशन व तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑगस्ट रोजी सीबीडी बेलापूर येथे वृक्षारोपण सोहळा पार पडला.

या वेळी एस.आर.दळवी फाउंडेशनचे प्रमुख रामचंद्र (आबा) दळवी यांचे सुपुत्र शिवम दळवी, तेरणा कॉलेजतर्फे डॉ. प्रियांका साळुंखे व प्रा. आनंदी कवठेकर व विद्यार्थी उपस्थित होते. पर्यावरण संरक्षणाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेकडून सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथील क्रिकेटच्या मैदानात जांभूळ, सिताफळ, रामफळ, पेरू, चिंच इत्यादी फळ झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘ठाणे'तील गणेशोत्सव आदर्श पध्दतीने साजरा करुया