नागपंचमी निमित्त सापांबद्दलच्या अंधश्रद्धा विषयावरील संवादसत्रातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन

नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवी मुंबईतील बेलापूर शाखेतर्फे नागपंचमी निमित्ताने सापांबद्दलच्या अंधश्रद्धा या विषयावर ८ ऑगस्ट रोजी पनवेल तालुक्यातील रोहिंजण येथील राजा प्रसेनजीत पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज येथे संवादसत्र पार पडले.

 नेचर फ्रेण्ड सोसायटी (ऱ्इए) पनवेलचे संस्थापक अध्यक्ष व सर्पतज्ञ सतोष उदरे यांनी प्रतीक शेंद्रे व आर्यन उदरे यांच्या सहकार्याने झ्झ्ऊ द्वारे विद्यार्थ्यांना सापांबद्दलची माहिती दिली. सापांबद्दलच्या समाजात असलेल्या अंधश्रद्धा उलगडून सांगितल्या. दूध हे सापाचे अन्न नाही तर उंदीर, बेडूक व छोटे किटक हे आहे. सापाच्या डोक्यावर नागमणी नसतो. सापाच्या पुढे पुंगी वाजवली म्हणून साप डोलत नाही; कारण सापाला बाह्य कर्ण नसतात. साप त्याच्या पुढे असलेल्या पुंगीचा वेध घेत असतो. जसी पुंगी हलवतो तसा तो हालत असतो. सापाचे विष मंत्राने उतरत नाही, तर तातडीने योग्य वैज्ञाकिय उपचाराने त्या विषापासून आपण वाचू शकतो आदि वस्तुस्थिती यावेळी विद्याथ्यार्ंना समजावून सांगण्यात आली. शाळेचे प्रमुख प्रो. रमेश करडे यांच्या प्रयत्नामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात महा. अंनिस. बेलापूर शाखा कार्याध्यक्ष महेंद्र राऊत व कार्यकर्ते ज्योती क्षिरसागर, अशोक निकम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर येथे वृक्षारोपण सोहळा संपन्न