वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
आप महाराष्ट्रातील २८८ जागा लढविणार
नवी मुंबई : आम आदमी पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणीतर्फे येणारी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणाचा दृढनिश्चय करण्यात आला असून त्याप्रमाणे ‘आप महाराष्ट्र'चे सर्व विभागीय संघटक जोमाने कामाला लागले आहेत.
‘आप'चे महाराष्ट्र सहप्रभारी गोपालभाई इटालिया यांच्या निर्देशानुसार प्रभावी नियोजनासाठी ‘टीम आप महाराष्ट्र'चे ९ विभागीय प्रभाग करण्यात आले आहेत. त्या प्रमाणे नवी मुंबई विभाग (ठाणे, पालघर,नवी मुंबई), पुणे विभाग (अहमदनगर, सोलापूर, पुणे), कोल्हापूर विभाग (सातारा, सांगली, कोल्हापूर), पूर्व मराठवाडा विभाग (बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद), पश्चिम मराठवाडा विभाग (सम्भाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली), नाशिक विभाग (धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक), कोकण विभाग (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड), पश्चिम विदर्भ विभाग (अमरावती, वाशीम, अकोला, यवतमाळ, बुलढाणा), पूर्व विदर्भ विभाग (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली) या जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. ‘आप'तर्फे सदर सर्व जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांच्या आढावा घेण्यासाठी प्रत्येक विभागीय आणि जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका चालू आहेत.
सर्वप्रथम आप महाराष्ट्र कार्यकारणी कडून प्रदेश अध्यक्ष अजित फाटके यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील सामान्यजनांकडून इच्छुक उमेदवारांसाठी गुगल फॉर्म द्वारे डेटा संकलन करण्यात आले. ‘आप'च्या दिल्ली आणि पंजाब मधील सामान्य जनताभिमुख कामाच्या झपाट्यामुळे महाराष्ट्रभरातून इच्छुक उमेदवारांना आकृष्ट करीत गुगल फॉर्म ला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. एकट्या नवी मुबईतून २० पेक्षा जास्त स्थानिक नागरिकांनी लढण्याची इच्छा दाखविली आहे.
त्याअनुषंगाने ३ ऑगस्ट रोजी टीम आप नवी मुंबई क्षेत्रात येणाऱ्या ऐरोली आणी बेलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक, महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाली. बैठकी दरम्यान राज्य सहसचिव तथा माजी नवी मुंबई अध्यक्ष श्यामभाऊ कदम यांच्याकडून आप नवी मुंबई कार्यकर्त्यामधून १० इच्छुक उमेदवार आणि गुगल फॉर्म मधील २० अशा एकूण ३० इच्छुक उमेदवारांची यादी धनंजय शिंदे यांना सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी ‘टीम आप नवी मुंबई'चे अध्यक्ष दिनेश ठाकूर, उपाध्यक्षा प्रीती शिंदे, देवराम सुर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
‘आप'चे राष्ट्रीय संघटक तथा राज्यसभा खासदार संदीप फाटक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रामधील सर्व २८८ जागांवर ‘आप'ला येणारी विधानसभा निवडणूक लढवायची आहे.
-धनंजय शिंदे -उपाध्यक्ष, आप-महाराष्ट्र.
‘टीम आप नवी मुंबई'च्या दोन्ही विधानसभा मतदारसांघातील सर्व वॉर्ड अध्यक्षांनी आपापल्या प्रभागातील वॉर्ड कार्यकारिणी पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांना घेऊन प्रचाराची सुरवात करावी. - दिनेश ठाकूर, कार्यकारी अध्यक्ष-आप नवी मुंबई.