वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
मिरा भाईंदर शहराच्या भवितव्यासाठी ‘ CSR कॉन्क्लेव्ह 'चे आयोजन
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून मिरा भाईंदर शहराचा मूलभूत विकास व्हावा याकरिता तसेच सन २०४७ पर्यंत शहराचा अत्याधुनिकरित्या कायापालट व्हावा या दृष्टीकोनातून उद्या ७ ऑगस्ट रोजी ‘CSR कॉन्क्लेव्हः Transforming Mira Bhayandar@2047 'चे आयोजन भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह सभागृह येथे करण्यात आले आहे. असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी मिरा-भाईंदर महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
या CSR कॉन्क्लेव्ह'चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शहरातील विकासक व संस्था यांच्याशी होणाऱ्या संवादातून प्रभावी उपक्रम राबविणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या भविष्याला आकार देण्यासाठी डायनॅमिक प्लॅटफॉर्म म्हणून काम करण्याचा आहे. सीएसआर उपक्रम राबवू इच्छिणाऱ्या सर्व कॉर्पोरेटस् आणि विकास प्रकल्पांवर काम करण्यास उत्सुक असलेल्या सर्व संस्थांसाठी महापालिकेचे दरवाजे खुले आहेत. या ‘कॉन्क्लेव्ह'मध्ये महापालिका पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य सेवा या मुख्य तीन विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. विचारवंत नेते, उद्योग तज्ञ आणि सरकारी अधिकारी शिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य सेवा या क्षेत्रातील जागतिक आव्हाने आणि नाविन्यपूर्ण उपायांवर चर्चा करणार आहेत.
शैक्षणिक पायाभूत सुविधा वाढवणे, डिजिटल साधने सादर करणे आणि वय वर्ष १८ पर्यंत रोजगारक्षमता सुनिश्चित करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येणारआहे. पर्यावरणीय शाश्वतता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था, टिकाऊ शहरी परिसंस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी कचरा व्यवस्थापन, प्रदुषण नियंत्रण आणि हिरव्या जागांचा विस्तार करणे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, वैद्यकीय उपकरणांचा प्रवेश सुनिश्चित करणे आणि मजबूत प्राथमिक आरोग्य सेवा प्रणाली स्थापित करून शहरातील नागरिकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस महापालिकेचा आहे.
‘कॉन्क्लेव्ह'चे उद्दिष्ट केवळ मिरा-भाईंदर शहराच्या भल्यासाठीच नव्हे तर मोठ्या एमएमआरडीए आणि मुंबई शहर क्षेत्रातील भागधारकांना एकत्र आणणे आणि त्यांना गुंतवणे आहे. विविध भागधारकांना जोडून, परिषद शाश्वत वाढ आणि सुधारित सार्वजनिक सेवांमध्ये योगदान देणाऱ्या प्रादेशिक विकास उपक्रमांना चालना देईल. या काँक्लेव्हमध्ये सहभाग तसेच ब्रॅण्डिंग पार्टनर असलेल्या संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. निती आयोग सदर कार्यक्रमासाठी धोरणात्मक मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करणार आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी कौशल्य, रोजगार, उद्योजकता, इनोव्हेशन विभाग, महाराष्ट्र सरकार नवोन्मेष आणि उद्योजकता उपक्रमांना समर्थन देणार आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, महाराष्ट्र सरकार प्रादेशिक विकासासाठी परिवर्तनकारी प्रकल्पांमध्ये भागीदारी राहणार आहे.
दरम्यान, सामाजिक संस्था, विकासक, अन्य संस्था आणिशहरातील नागरिकांनी या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून मिरा-भाईंदर महापालिकेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आवाहन आयुक्त काटकर यांनी केले आहे.