वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
लाडक्या बहिणीची सुरक्षा वाऱ्यावर, गृहखात्याची अब्रू वेशीवर!
वाशी : महाराष्ट्र राज्य शासन एकीकडे ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजना राबवून महिलांना आर्थिक हातभार लावणार आहे. तर दुसरीकडे याच लाडक्या बहिणींवर नराधम अत्याचार करत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीची सुरक्षा वाऱ्यावर पडली असून, गृह खात्याची अब्रू देखील वेशीवर टांगली आहे, अशा शब्दात निषेध करत, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या (शरदचंद्र पवार) नवी मुंबई जिल्हा महिलाध्यक्ष सौ. सलुजा संदीप सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्व. अक्षता म्हात्रे आणि स्व. यशश्री शिंदे यांच्यावर झालेल्या अत्याचार तसेच दररोज संपुर्ण राज्यात घडणाऱ्या महिला अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांविरोधात तीव्र निषेध आंदोलन नेरुळ - सीवूड्स (पूर्व) तसेच संपूर्ण नवी मुंबई मध्ये करण्यात आले.
या आंदोलनात सौ. सलुजा सुतार यांच्यासह हिराबाई पाटील, अस्मिता साळगावकर, पुष्पा पावले, रेशमा चव्हाण, अश्विनी मिश्रा, वैशाली म्हाडगुत, मनाली सणस, प्रभा उनागर, भावीनी पांडव, तेजस्वी नाईक, संगीता बर्वे, संगीता जाधव, सायली गोडे, बबीता टंक, नरेश कालेकर, जितू कोळी, हिमेश पांडव आणि तेजस फणसे आदी सहभागी झाले होते.