ठाणे-बेलापूर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

वाशी : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे रेल्वे स्थानक समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तुर्भे रेल्वे स्थानक समोरील वाहतुकीला ब्रेक लागला असून, या ठिकाणी रोज वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे तुर्भे रेल्वे स्थानक समोरील रस्त्यावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी वाहन चालक करीत आहेत.

ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे रेल्वे स्थानक समोर होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महापालिका या ठिकाणी एक उड्डाणपूल बांधत आहे. सदर काम गेल्या एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आले. उड्डाणपूल उभारण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करण्यात आले असून, बाजूला संरक्षक बॅरिगेट लावले आहेत.सध्या पावसाळा सुरु असल्याने खोदकाम बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, खोदकाम बंद असले तरी तुर्भे रेल्वे स्थानक समोरील रस्त्यावरील दोन्ही मर्गिकांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे तुर्भे रेल्वे स्थानक समोरील रस्त्यावरील वाहतुकीला ब्रेक लागला असून, या ठिकाणी दररोज वाहतुक कोंडी होत आहे.त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत ठाणे-बेलापूर मार्ग कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 लाडक्या बहिणीची सुरक्षा वाऱ्यावर, गृहखात्याची अब्रू वेशीवर!