वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
शर्मिला राज ठाकरे यांनी घेतली नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट
नवी मुंबई: नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे यांच्यावर झालेला अत्याचार, उरण मधील यशश्री शिंदे यांच्यावर झालेला अत्याचार व उलवेमधील तरुणीवर झालेला अत्याचार या संदर्भात सौ. शर्मिला राज ठाकरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची ३० जुलै रोजी भेट घेतली.
सौ. शर्मिला ठाकरे यांनी या तिन्ही घटनांबद्दल संताप आयुक्तांकडे व्यक्त केला. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. अशा प्रकरणात कोणताही राजकीय पक्ष पोर्शे कार सारखा हस्तक्षेप करत नाही. मग पोलिसांची दहशत का दिसत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिसांची दहशत दिसली पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच शक्ती कायदा मंजूर करून त्याच्या अंमलबजावणी साठी मनसे केंद्रात पाठपुरावा करेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात मनसे सरचिटणीस सौ. शालिनी ठाकरे, सौ. रिटा गुप्ता, सौ. स्नेहल जाधव, मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, पनवेल जिल्हा अध्यक्ष योगेश चिले उपस्थित होते.