वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
ऐरोलीमधील गंगा पूजन, कृतज्ञता पुरस्कार सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के यांची उपस्थिती
नवी मुंबई : ह भ प राहुलजी महाराज ताम्हाणे आणि ह भ प भागवताचार्य दिनेशजी महाराज औटी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप ट्रस्ट, श्री कृतज्ञता ट्रस्ट व श्री ममित विजय चौगुले प्रतिष्ठान यांच्या वतीने २८ जुलै रोजी गंगा पूजन आणि कृतज्ञता पुरस्कार सोहळा ऐरोली मधील हेगडे भवन हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी ओम श्री श्री १००८ धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी ब्रह्ममूर्ती शांतानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते खासदार नरेश म्हस्के यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ५१ भजन मंडळांना वारकरी कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले. सोहळ्यासाठी सुमारे १५०० ते २००० वारकरी आले होते.
गंगा पूजन, वारकरी पूजन, ममीतजी विजय चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाले. दीप प्रजवलन ह भ प सुखदेवजी महाराज लांडगे यांच्या हस्ते झाले. ओम श्री श्री १००८ धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते विजय चौगुले यांचा सन्मान करण्यात आला. ओम श्री श्री १००८ धर्मसिंधू महामंडलेश्वर स्वामी विजयानंद सरस्वती महाराज यांचा सन्मान सौरभदादा भोर यांनी केला. धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह भ प अक्षयजी महाराज भोसले यांनी वारकऱ्यांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले. ह भ प राहुलजी महाराज ताम्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. हरिपाठ आणि ह भ प ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव यांनी प्रवचनाने सांगता केली.