वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
बीसीसीआय कंपनीतील कामगारांना ७ हजार रुपये पगारवाढ
पनवेल : कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने यशस्वी मध्यस्थी करुन बीसीसीआय कळंबोली सिमेंट प्लांट मधील कामगारांना ७ हजार रुपये पगारवाढ मिळवून दिली आहे.
बीसीसीआय कळंबोली सिमेंट प्लांट मधील कामगारांचा पगारवाढीचा प्रश्न मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित होता. मध्येच बीसीसीआय कळंबोली सिमेंट प्लांट ‘अदानी ग्रुप'ने टेकओव्हर केला. त्यामुळे व्यवस्थापन बदलल्याने कामगारांची पगारवाढ करण्यासाठी ‘न्यू मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना'ला संघर्ष करावा लागला. परंतु कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने यशस्वी मध्यस्थी करुन बीसीसीआय कळंबोली सिमेंट प्लांट मधील कामगारांना ७ हजार रुपये पगारवाढ मिळवून दिली. याशिवाय महागाईनुसार महागाई भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कामगार कायद्यानुसार बोनस, दिड लाख रुपयांची फॅमिली मेडीक्लेम देण्याचे करारात नमूद करण्यात आहे आहे. या करारामुळे बीसीसीआय कळंबोली सिमेंट प्लांट मधील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पगारवाढ झाल्याने कामगारांनी ‘न्यू मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना'चे अध्यक्ष महेंद्र घरत आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
वेतनवाढ करार प्रसंगी ‘न्यू मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना'चे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, अरुण म्हात्रे तसेच व्यवस्थापन तर्फे चिफ एक्झीक्युटिव्ह अनुप कुमार साहू, कामगार प्रतिनिधी विश्वनाथ गडगे, प्रदीप दत्ता, शिवनारायण त्रिपाठी, गौतम शर्मा आदी उपस्थित होते.