वाशी सेक्टर-९ मधील पादचारी पुलाचे काम पूर्ण

वाशी : वाशी सेक्टर-९ आणि सेवटर-१६ या दोन सेवटरना जोडणाऱ्या  पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच सदर पुल पादचाऱ्यासाठी खुला होणार आहे. या पुलाच्या लिपटचे काम आवश्यक परवानगी अभावी रखडले असून, परवानगी मिळाल्यावर ‘लिपट'चे काम पूर्ण केले जाणार आहे, असे नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.  सध्या पादचारी पुलाच्या उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे.

वाशी-कोपरखैरणे या मुख्य रस्त्यावर एकही पादचारी पूल नाही. त्यामुळे पादचारी ठिकठिकाणी रस्ता ओलांडत असल्यामुळे मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. वाशी-कोपरखैरणे या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका द्वारे वाशी-कोपरखैरणे या मुख्य रस्त्यावर पादचारी पूल बांधण्याचे काम गेल्या वर्षीपासून चालू आहे. वाशी सेक्टर- ९ येथील या पहिल्या पादचारी पुलाच्या कामातील काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर पादचारी पूल उभारण्याचे काम गतीने चालू आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सदर काम पूर्ण होणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे सदर पादचारी पूल उभारण्याच्या कामास उशीर झाला. ‘सिडको'ने नवी मुंबई शहराची निर्मिती करतांना वाशी नोडपासून प्रारंभ केला. त्यावेळी पुढील काही वर्षांतील वाढती लोकसंख्या, वाहने यांचा ‘सिडको'ने बांधलेला अंदाज काही प्रमाणात फोल ठरला आहे. त्याचा प्रत्यय सध्या वाशी सेक्टर- ते सेक्टर-२८पर्यंत गर्दीच्या वेळी सर्वांना येत आहे.

वाशी सेक्टर-९,१०,१५,१६,१७ या विभागात पुष्कळ प्रमाणात झालेले वाणिज्यकरण (व्यवसाय) आणि अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांनी केलेले बहुमजली बांधकाम, पुनर्विकासामुळे काही घरांची वाढलेली संख्या, विशेषतः सण-उत्सव या काळात खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक वाशी मध्येच अधिक प्रमाणात येणे, यांमुळे वाशी सेक्टर-९ ते १५ परिसर बाराही महिने वाहने आणि पादचारी यांनी ओव्हरपलो असतो. परिणामी वाशी रेल्वे स्थानक येथून कोपरखैरणे येथे जाण्यासाठी निघालेला प्रवाशी गर्दीच्या वेळात अर्धा तास उशीराने घरी पोचतो, (अन्य वेळी १५ मिनिटे वाशी ते कोपरखैरणे प्रवासाला लागतात.) अशी स्थिती गेल्या काही वर्षांपासून झाली आहे. यावर उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात महापालिका शहर अभियंता विभागाने अधिक गर्दीच्या ठिकाणी वाहने पार्क व्हावी आणि पादचाऱ्यांनाही चालणे सुलभ व्हावे, अशी पदपथांची पुनर्बांधणी केली. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची आवश्यकता आहे, तेथे पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाशी मधील पहिला पादचारी पूल वाशी सेक्टर-९ येथे बांधण्याचे काम चालू आहे. या कामामध्ये काही तांत्रिक बाबीमुळे (न्यायालयीन) विलंब झाला होता. आता तांत्रिक अडथळा दूर झाल्याने वाशी सेवटर-९ मध्ये पादचारी पूल उभारण्याचे काम अधिक गतीने पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. २ कोटी ४४ लाख रुपये खर्चाचे सदर काम असून, पादचारी पुलाची लांबी २७ मीटर आणि  रुंदी ३ मीटर इतकी आहे. या ठिकाणी २ लिपट देखील बसवण्यात येणार आहेत. यामुळे जेष्ठ नागरिक आणि लहान मुले-मुली यांना पूल चढ-उतार करण्यास सोयीचे होणार आहे.

वाशी सेक्टर-९ आणि सेवटर-१६ या दोन सेवटरना जोडणारा पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. फक्त लिपटसाठी आवश्यक लागणारी  परवानगी मिळणे बाकी आहे. सदर परवानगी मिळाल्यावर या पुलावरील लिपट उभारणीचे  काम पूर्ण केले जाणार असून, लिपट उभारणीनंतर पादचारी पूल नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. - अजय संख्ये, कार्यकारी अभियंता- वाशी विभाग कार्यालय, नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बीएमटीसी कामगार करणार ९ ऑगस्टला सिडको गेट समोर लाक्षणिक उपोषण