गेट वे प्रकल्पातील मुळ सदनिकाधारकांना मे. मेट्रीकॉम रिअल्टी यांच्याकडून कायमस्वरुपी पर्यायी निवास कराराचे वितरण

नवी मुंबई : सिडको सोसायट्यांचे तसेच जुन्या खासगी गृहनिर्माण सोसायटींचे रिडेव्हल्पमेंट (पुनर्विकास)चे वारे जोरदार वाहत असून टॉवर या नावाची भुरळ आता नवी मुंबईकरांना पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर वाशी सेक्टर सहा मधील गेट वे सीव्ह्यू को.ऑप. हौसिंग सोसायटीमधील म्हणजेच पूर्वीच्या बी टाईप असोसिएशन मुळ रहीवाशांना पर्यायी निवास कराराचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे. 

यावेळी मे. मेट्रीकॉम रिअल्टीचे भागीदार विजय पाटील, रोशन मोरे, आकाश मोरे, नलीन शर्मा, अभिषेक शर्मा, सुंदर लाखानी, नरेश लाखानी यांच्या उपस्थितीत सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये या पर्यायी निवास कराराचे नुकतेच वितरण करण्यात आले. मे. मेट्रीकॉम रिअल्टी कंपनीचा ‘गेट वे’ हा वाशीतीलच नाही तर नवी मुंबईतील पहिलाच प्रोजेक्ट आहे.  प्रकल्पातील २८८ मुळ रहीवाशांना २० सप्टेंबर पर्यंत १० महिन्याच्या आतच १ बीएचके घर देणार आहेत.

मे. मेट्रीकॉम रिअल्टीकडून पर्यायी निवास करार बनवून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. मे. मेट्रीकॉम रिअल्टीचे भागिदार, सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि रहीवाशांनी परस्पर सुसंवाद व समन्वय साधून  अवघ्या १० महिन्यात प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण केल्याने रहीवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. . मे. मेट्रीकॉम रिअल्टीचे भागिदारांवर व त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर आमचा विश्वास असून लवकरच आम्हाला आमच्या सदनिका वेळेत मिळतील, असा विश्वास तेथील रहीवाशांकडून व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी सेक्टर-९ मधील पादचारी पुलाचे काम पूर्ण