मान्सूनपूर्व नालेसफाई योग्य न झाल्यानेच एपीएमसी मसाला बाजार जलमय

वाशी : मान्सूनपूर्व नालेसफाई कामात वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारात नालेसफाई केली जाते. मात्र, एपीएमसी बाजार आवारात योग्यरित्या नाले सफाई न झाल्याने एपीएमसी बाजार आवारात पाणी साचत आहे.त्यामुळे एपीएमसी मसाला बाजार आवारात मालवाहू वाहने रिकामी करण्यास अडचणी येत आहेत.

 मागील आठवडाभरापासून नवी मुंबई  शहरात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहरात पाणी साचत असून, एपीएमसी बाजार आवारात मोठया प्रमाणात पाणी भरत आहे. एपीएमसी प्रशासनाकडून एपीएमसी बाजार आवारात मान्सूनपूर्व नालेसफाई केली जाते. मात्र, ठेकेदाराकडून एपीएमसी बाजार आवारातील नालेसफाई करताना पूर्ण नालेसफाई न करता केवळ झाकणे काढून तेवढाच गाळ काढला जात असल्याने पावसाळ्यात एपीएमसी बाजार आवारात पाणी साचत आहे.

यावर्षी पावसाळा सुरु झाल्यानंतर एपीएमसी बाजार आवारातील मसाला बाजारात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच माल धक्यावर पाणी साचत असल्याने शेतमालानी भरलेली वाहने उभी करुन माल खाली करण्यासाठी अडचणी येत आहेत. मागील महिन्यात एपीएमसी मसाला बाजारातील व्यापाऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाला घेराव घालत बाजारातील समस्यांचे गाऱ्हाणं मांडले होते. त्यावेळी एपीएमसी प्रशासनाने देखील एपीएमसी मसाला बाजारातील समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एपीएमसी प्रशासनाच्या आश्वासनानंतर देखील एपीएमसी मसाला बाजार आवारातील परिस्थिती ‘जैसे थे' आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शहाबाज मधील ४ मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त