वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
नवी मुंबई मधील पाणी कपात रद्द
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणामधून नवी मुंबई महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा होत असून यावर्षी पावसाळी कालावधी सुरू होऊनही 15 जून 2024 पर्यंत केवळ 78.60 मिमी इतकाच अपुरा पाऊस झालेला होता. त्यावेळी मोरबे धरणामध्ये फक्त 26% इतकाच पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करताना संध्याकाळच्या पाणी पुरवठयात वाढीव कपात करण्यात आलेली होती.
सध्या जुलै महिन्यात चांगल्या प्रकारे पर्जन्यवृष्टी होत असून 26 जुलै पर्यंत मोरबे धरण क्षेत्रामध्ये एकूण 2407 मिमी इतका पाऊस झालेला आहे. यामुळे मोरबे धरणामध्ये एकूण 74% पाणी साठा उपलब्ध झालेला आहे. त्या अनुषंगाने 15 जून 2024 पासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात केलेली पाणी कपात रद्द करण्यात येत आहे.
29 जुलै पासून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू राहील याची कृपया नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
दरम्यान, नवी मुंबईकर नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी आभार व्यक्त केले आहेत.