वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
३४ कोटी खर्चातून नव्याने उभे राहणार बेलापूरचे उदंचन केंद्र
नवी मुंबई : बेलापूर विभागातील सेक्टर-१२ येथे असलेले सिडको निर्मित पावसाळी जलउदंचन केंद्र असून गेली ३५ ते ४० वर्षे जुने आहे. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने ३४ कोटी उपलब्ध करुन सदर जुने जलउदंचन केंद्र निष्कासीत करुन नवीन जलउदंचन केंद्र (पंप हाऊस) बांधण्यात येणार आहे. सदर कामाचे भूमीपूजन २३ जुलै रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पुढे सांगितले की, सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१२ येथे असणारे पावसाळी उदंचन केंद्र (पंप हाऊस) सिडको कालीन असून ते ३५ ते ४० वर्षे जुने आहे. सद्यस्थितीत या जलउदंचन केंद्राची दुरावस्था झालेली आहे. तसेच पंपींग मशिनिरी जुन्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. शिवाय पंप हाऊसची इमारत धोकादायक स्थितीत असल्याने ती तोडून नवीन बांधणे आवश्यक आहे. सीबीडी, सेक्टर-४,५,६ येथील इमारत लो लाईन क्षेत्रात असल्यामुळे येथे पावसाळा कालावधीत अतिवृष्टीमध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे सदर उदंचन केंद्र पाडून ते सुमारे ३४ कोटी खर्चुन नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक गुरखे, दिपक पवार, दिनानाथ पाटील, भरत जाधव, ‘भाजपा'चे माजी जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, नवी मुंबई उपाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग पाटील, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपायुक्त सोमनाथ पोटरे, बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपभियंता अजय पाटील तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.