एफ.जी.नाईक महाविद्यालयामध्ये गुरू पौर्णिमेचा उत्साह

नवी मुंबई : श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ.जी.नाईक महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रति असलेला आदर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून व्यक्त केला.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुरुचे स्थान किती महत्त्वाचे आहे, गुरु शिष्य या नात्यावर विविध दाखले देत भाष्य केले व आपला व्यक्तिमत्व विकास कसा केला पाहिजे याचे मार्गदर्शन केले. प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील. कु.नम्रता भद्रिगे, प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील कु.त्रिशा अंबिके यांनी गायन  तसेच महाविद्यालयातील  वाणिज्य शाखेची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी कु.रेश्मा हटकर हिने भाषण व वाणिज्य व कला शाखेतील द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. दिशा सावंत, कु.हर्षदा मुदगल, कु.अलीशा मेर, कु.आदिती खोत व कु.भूमिका म्हात्रे यांनी आपल्या नृत्याविष्कारातून सर्व गुरुजनांना मानवंदना दिली. महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनीही स्वहस्ते बनवलेले कलात्मक शुभेच्छा कार्ड देत शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला. या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आमची जडणघडण कशी यशस्वी होत गेली व ध्येयप्राप्तीपर्यंत कसे पोहोचता येईल याविषयीची जाणीव शिक्षकांनी वेळोवेळी आम्हाला करून दिली याबाबत मनोगतातून भावना मांडल्या आणि सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन  महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी कु.साक्षी गायकवाड हिने केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३४ कोटी खर्चातून नव्याने उभे राहणार बेलापूरचे उदंचन केंद्र