वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
कविता डाँट कॉमच्या वतीने गुरूपौर्णिमेनिमित्त कवितेतून गुरूंना वंदन
नवी मुंबई : शिवतुतारी प्रतिष्ठान संचलित कविता डाँट काँमच्या वतीने गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने विज्ञानभवन, नेरूळ येथे २१ जुलै रोजी खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील चाळीस कवींनी सहभाग नोंदवत विविध विषयांवरील कविता सादर करत गुरूपौर्णिमा साजरी केली.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मृणाल केळकर यांनी कविता डाँट कामच्या उपक्रमाचे कौतुक करत सुमधुर आवाजात कविता सादर केल्या. कविता डाँट काँम अध्यक्षीय समारोप करताना प्रमोद कर्नाड यांनी कवितेचे महत्त्व विशद करत विविध आठवणी सांगितल्या. त्यानंतर रंगलेल्या मैफिलीतुन मी असा जाऊ कसा ही गझल अनोख्या शैलीत सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. खुल्या कविसंमेलनात उद्घाटन सत्राचे सुत्रसंचलन शंकर गोपाळे यांनी करत कार्यक्रमात रंगत आणली. समारोप सत्रात नारायण लांडगे पाटील यांनी सुत्रसंचलन करत उपस्थितांना खळखळून हसवले. कविता डाँट काँमचे निर्मिती सुत्रधार प्रा. रविंद्र पाटील यांनी कविता डाँट कॉमचे मासिक संमेलनाचे नियोजन विषद करत कविता डाँट काँमची भुमिका मांडली. लोककवी जितेंद्र लाड यांनी नियोजनाची भुमिका निभावली. तंत्रस्नेही वैभव वऱ्हाडी आणि रूद्राक्ष पातारे यांनी हा सुंदर कार्यक्रम कॅमेराबध्द केला. मान्यवरांच्या हस्ते सहभागी कवींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अंकिता गोळे यांनी केले. प्रसाद माळी आणि दिक्षिता लाड यांच्या पसायदानाने सांगता झाली. याप्रसंगी विद्याभवनचे सचिव दिनेश मिसाळ, उपप्राचार्य सुवर्णा मिसाळ, दिलिप जांभळे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.