वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
कोकणातील प्रवाशांसाठी खुशखबर!
नवी मुंबई : श्री गणेशोत्सवात होणारी अतिरिवत गर्दी कमी करण्यासाठी ‘कोकण रेल्वे'तर्फे येत्या १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत गणपती विशेष गाड्या-२०२४ चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर सर्व गाड्यांचे आगाऊ आरक्षण (बुकींग) आज २१ जुलै २०२४ रोजी प्रवासी आरक्षण प्रणालीवर सुरु होणार आहे.
त्यानुसार गाडी क्र.०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी रोड- मुंबई सीएसएमटी स्पेशल गणेशोत्सव काळात दररोज कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. सदर गाडी १ ते १८ सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री १२.२० मिनिटाने मुंबईतून तर सावंतवाडी येथून दररोज दुपारी ३.१० वाजता सुटेल. या विशेष गाडीला एकूण २० डबे असणार आहेत.
गाडी क्र.०११५३/०११५४ मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी- मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक) देखील १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत दररोज मुंबई सीएसएमटी येथून सकाळी ११.३०वाजता तर रत्नागिरी येथून दुपारी १.३० वाजता सुटेल. या गाडीला देखील २० डबे असणार आहेत.
ट्रेन क्र.०११६७/०११६८ लोकमान्य टिळक (टी)-कुडाळ-लोकमान्य टिळक (टी) विशेष (दैनिक) १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत धावणार असून ही गाडी एलटीटी येथून दररोज रात्री ९ वाजता, तर कुडाळ येथून दररोज दुपारी १२ वाजता सुटेल. या ट्रेनला २० कोच असणार आहेत.
गाडी क्रमांक-०११७१/०११७२ लोकमान्य टिळक (टी)-सावंतवाडी रोड-लोकमान्य टिळक (टी) विशेष (दैनिक) १ ते १८ सप्टेंबर कालावधीत दररोज सकाळी ८.२० वाजता एलटीटी येथून तर सावंतवाडी रोड येथून रात्री १०.२० मिनिटाने सुटेल.
गाडी क्र.०११५५/०११५६ दिवा जंवशन-चिपळूण- दिवा जंवशन मेमू स्पेशल गणेशोत्सव काळात दिवा जंवशन येथून सकाळी ७.१५ वाजता तर चिपळूण येथून दुपारी ३.३० वाजता सुटेल.
०११८५ /०११८६ लोकमान्य टिळक (टी)-कुडाळ-लोकमान्य टिळक (टी) विशेष (त्रि-साप्ताहिक) गाडी २ ते १९ सप्टेंबर या कालावधीत सोमवार, बुधवार आणि शनिवारी दुपारी १२.३० वाजता लोकमान्य टिळक येथून तर कुडाळ येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११६५/०११६६ लोकमान्य टिळक (टी)-कुडाळ - लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) ३ ते १९ सप्टेंबर यादरम्यान दर मंगळवारी रोजी पहाटे १२.४५ वाजता एलटीटी येथून तर ४.३० वाजता कुडाळ येथून सुटेल.
सदर सर्व गणपती स्पेशल गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाऊनलोड करा. सदर सर्व गाड्यांचे आगाऊ आरक्षण (बुकींग) २१ जुलै २०२४ रोजी प्रवासी आरक्षण प्रणालीवर सुरु होईल, अशी माहिती ‘कोकण रेल्वे'चे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दिली.