वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था घणसोलीतर्फे आषाढीनिमित्त हरिनाम दिंडी
नवी मुंबई : घणसोली येथील ज्येेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था व ओम साई मॉर्निंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजता हरिनाम दिंडी चे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष भास्कर आव्हाड व श्री रणपिसे यांच्या आवाहनानुसार सेक्टर ११ मधील साईबाबा मंदिर, साईबाबा चौक ते सेक्टर ९ मधील आदर्श सोसायटी घराेंदास्थित श्री विठ्ठल रखुमाई मंदिरपर्यंत हरिनाम दिंडी आयोजित केली होती.
ह्या हरिनाम दिंडीत ओम साई मॉर्निंग ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी हरिनाम दिंडीत विशिष्ट पोशाख व पांढरी टोपी परिधान करून व कपाळी टिळा लाऊन अगदी शिस्तबद्ध पध्दतीने हरिनाम दिंडीचे संचलन केले. दिंडी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या हरिनामाच्या गजराने सर्वत्र दुमदुमली होती. भास्कर आव्हाड, प्रमोद गायकवाड, दत्तात्रय कुंजीर, श्रीरंग निकम, बाजीराव सुर्यवंशी, दत्तात्रय झगडे, शंकर घाडगे, घुले, प्रदीप जोशी इत्यादीनी सातत्याने विठ्ठल नामाचा जयघोष करीत पहाटेचे वातावरण हरिनाम स्मरण व तेही टाळ गजराच्या साथीने अत्यंत भक्तिमय व आनंदमयी केले होते. हरिनाम दिंडी विठ्ठल मंदिर पर्यंत आल्या नंतर विट्ठल मंदिर परिसरात दत्तात्रय कुंभार यांनी व आदर्श सोसायटीचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी व सदस्य यांनी दिंडीचे व सहभागी भक्तांचे स्वागत करून त्यात सहभाग घेतला व तसेच या दिंडीत दळवी अकॅडेमी ब्रँडचे जवळपास अजून ७५ जणांनी सहभाग दिंडीचे उत्साहात हरिनामाच्या गजराने वातावरण अधिक प्रसन्नमय केले. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरात पूजा अर्चा, महाआरती व आकर्षक सजावट करण्यात आली होती.