वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
रानसई धरण ‘ओव्हर फ्लो'
उरण : उरण तालुक्यातील दोन लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण ओव्हर पलो होऊन वाहु लागले आहे.मागील काही दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरुन येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरुन वाहु लागले आहे. मागील वर्षीही १८ जुलै रोजीच रानसई धरण पूर्ण क्षमतेने भरले होते, अशी माहिती उरण एमआयडीसी उप अभियंता वि्ील पाचपुंड यांनी दिली.
उरण तालुक्यातील रानसई धरण १९७१ साली बांधण्यात आले आहे. रानसई धरणाची उंची ११६ फूट ६ इंच असून, धरणाची साठवून क्षमता १० दशलक्ष घनमीटर आहे. उरण परिसरातील २५ ग्रामपंचायती,उरण शहर आणि काही औद्योगिक विभागासह सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी जून महिना जवळपास पुरता कोरडाच गेला होता. पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र, त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासुनच धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली होती. त्यातच डोंगर माथ्यावरुन येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे १५ जुलै रोजी सकाळी १२ वाजल्यापासून धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे उरणकरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती उप अभियंता वि्ील पाचपुंड यांनी दिली.