वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
नेरुळमध्ये आढळलेला दुर्मिळ सागरी पक्षी लेसर नॉडीचा मृत्यू
नवी मुंबई : भारतात क्वचितच दिसणारा मालदीवचा सागरी पक्षी ए लेसर नॉडी १४ जुलैरोजी सीवुडस् एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये दिसला खरा; पण एव्हीयन पाहुणा वाचला नाही. शास्त्रीय नाव असलेला पक्षी ‘ॲनस टेन्युरोस्ट्रिस' लांब चोचीने धडपडताना दिसत होता, असे एनआरआय कॉम्प्लेक्सचे रहिवासी दिपक रामपाल यांनी सांगितले.
दिपक रामपाल यांनी वन्यजीव कल्याण संघटनेला (डब्ल्यूडब्ल्यूए) संपर्क साधला. यानंतर पाहुण्या पक्ष्याला ३० कि.मी. दूरवर असलेल्या डब्लूडब्ल्यूए वन्यजीव पुनर्वसन केंद्र मानपाडा, ठाणे येथे नेण्यात आले. दुर्दैवाने या पक्ष्याला वाचवता आले नाही, असे ‘डब्ल्यूडब्ल्यूए' चे बचावकर्ते सनप्रीत सावर्डेकर आणि मयूर दळवी यांनी सांगितले. या घटनेमुळे नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्याची गरज आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार म्हणाले.
जुईनगर येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ४ कोटी रुपये खर्चुन पशुवैद्यकीय रुग्णालयाची बांधलेली इमारत ३ वर्षांपासून कार्यान्वित नाही. महापालिकेने प्राण्यांच्या रुग्णालयात अंतर्गत बदल करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला. परंतु, महापालिका ठाणे, मुंबई आणि पनवेल येथील शेजारच्या महापालिकांशी किंवा राज्याच्या पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधू शकते, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे २१ व्या शतकातील शहराच्या महापालिकेने यापूर्वी डिझाईन पैलूवर काम केले नाही आणि आता ते बदल करण्यासाठी सल्लागारांना बोलवत आहेत. पक्ष्यांव्यतिरिक्त अनेक पाळीव प्राणी आणि भटके प्राणी आजारी पडतात, अपघातात जखमी होतात आणि ते वैद्यकीयदृष्ट्या दुर्लक्षित होतात. ती एक या शहरासाठी शोकांतिका असल्याचे बी. एन. कुमार आणि सामाजिक कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले.
 दरम्यान, ‘बीएनएचएस'ने ॲनस टेन्युरोस्ट्रिस पक्षी संशोधनासाठी वन विभागाकडून ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ‘युएनडीपी'ने मालदीवमध्ये नॉडी संवर्धन कार्यक्रम सुरु केल्याची बाब पर्यावरणवाद्यांनी ‘नॅटकनेवट'च्या निदर्शनास आणून दिली आहे. ‘मॉरिशियन वाईल्ड लाईफ फाऊंडेशन'च्या म्हणण्यानुसार समुद्री पक्षी महत्त्वाची सागरी पोषक तत्वे आणून जमिनीला सुपीक बनविण्यास मदत करतात. पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे वनस्पती आणि कीटकांची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे संपूर्ण अन्नसाखळीला मदत होते, असे ‘फाऊंडेशन'चे विकास तात्या यांनी स्पष्ट केले.
बेटांवरील समुद्री पक्ष्यांची उच्च घनता कोरल रीफसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे, ज्याला ते खत देतात आणि ते मत्स्यपालनाच्या आरोग्यासाठी योगदान देतात. पक्षी देखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळे सदर बाब पलेमिंगो आणि इतर स्थलांतरीत तसेच स्थानिक पक्ष्यांना वाचवण्यासाठी आमच्या मोहिमेला बळकटी देणारी आहे. -बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.