वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
नेरुळच्या नूतन मराठी विद्यालयात वृक्षदिंंडी
नवी मुंबई : नेरूळ येथील नूतन मराठी विद्यालयात १३ जुलै रोजी वृक्षदिंडी काढण्यात आली. या वृक्षदिंंडीमध्ये पारंपारिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वृक्षदिंडी ढोल ताशांच्या गजरात सेक्टर १९ नेरूळ परिसरातून काढण्यात आली. वृक्षदिंडीनंतर शालेय मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. कडुलिंब, चिकू, डाळिंब, पेरू, जांभूळ चिंच इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्षदिंडीमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कांबळे, विद्यालयाचे शिक्षक वृंद निलेश सैद, सुनिल पाटील, सौ सुजाता मुंढे, सौ लता औटी, जयवंत सुतार, राजू आदि उपस्थित होते.