वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
अमृतमहोत्सवी कवि संमेलनात पावसाच्या कविता सादर
ठाणे : उद्वेली बुक्स आणि कै. शांता वसंत पटवर्धन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथील शिरीष पै काव्यकट्ट्याचे अमृतमहोत्सवी कविसंमेलन वसंत सभागृह, ठाणे येथे १४ जुलै रोजी साजरे करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ कवयित्री प्रा.प्रतिभा सराफ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी सतत शिरीष पै कविकट्ट्याचे सतत ७५ कार्यक्रम चालू असल्याबद्दल उद्वेली बुक्स संस्थेचे कौतुक केले.
याप्रसंगी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, ज्येष्ठ कवी अनंत जोशी, अभिनेत्री मेघना साने, लेखक-समीक्षक शिवाजी गावडे, कवी कमलाकर राऊत, गीतकार मकरंद वांगणेकर हे मान्यवर उपस्थित होते. या अमृतमहोत्सवी शिरीष पै कवी कट्ट्यावरील कविसंमेलनात डॉ.सतीश कानविंदे, गिरीश काळे, डॉ मारुती नलावडे, उदय पळणे, कमलाकर राऊत, रवींद्र कारेकर, प्रकाश पोळ, डॉ. शेजवळकर, शिवाजी गावडे, संध्या लगड, कविता राऊत, मोरेश्वर बागडे, स्वाती गावडे, मकरंद वांगणेकर या मान्यवर कविंसह एकूण तीस कवींनी विविध प्रकारच्या तसेच पावसाच्या विविधांगी कविता सादर केल्या त्यांना रसिकांची चांगली दाद लाभली. यावेळी ज्येष्ठ संगीतकार हेमंत साने यांनी प्रतिभा सराफ यांची उन्हे सुखाची सजली आता ही गझल सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत जोशी यांनी केले.