वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
फेरीवाला अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम स्टेशनबाहेरील परिसर अनेक वर्षापासून फेरीवाला मुक्त आहे. मात्र, डोंबिवली पूर्वेकडील ‘ई' प्रभाग क्षेत्र हद्दीतील कावेरी चौक फेरीवाला मुक्त करण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते. येथील अनधिकृत फेरीवाल्यांनी चक्क रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडी होत असते. चौकाजवळ शाळा असून फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे भविष्यात विद्यार्थाच्या जीवाला धोका होऊ शकतो, अपघातही होण्याची शक्यता नकरता येत नाही. अपघात झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील का? असा प्रश्न जागरुक नागरिक सत्यवान म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. तर येत्या ४ दिवसात कावेरी चौकातील फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली नाही तर याच रस्त्यावर ठिय्या आंदोलन करु, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.
डोंबिवली पश्चिम स्टेशन बाहेरील परिसर ‘भाजपा'चे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनिषा धात्रक आणि फेरीवाला अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख विजय भोईर यांनी लक्ष दिल्याने फेरीवाला मुक्त झाला आहे. अनेक वर्षापासून यात सात्यता असल्याने नागरिक खुश आहेत. मात्र, डोंबिवली पूर्वेकडील कावेरी चौकात फेरीवाल्यांनी चक्क रस्त्यावर अतिक्रमण करत गाड्या लावल्या आहेत. महापालिका अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप जागरुक नागरिक सत्यवान म्हात्रे यांनी केला आहे.
किती वर्ष हिच परिस्थिती दिसते. कावेरी चौकाजवळ शाळा असून या रस्त्यावरुन विद्यार्थी शाळेत येत असतात. फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असतो. शाळेची बसला या रस्त्यावरुन जाताना वाहतूक कोंडीतून जागा काढत जावे लागते. सदर सर्व प्रकाराकडे महापालिका प्रशासन का लक्ष देत नाही. माझी विंनती आहे की, महापालिका प्रशासनाने कावेरी चौक फेरीवाला मुक्त करावा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार, असा इशारा सत्यवान म्हात्रे यांनी दिला आहे.
उघड्यावर गॅस सिलेंडरचा वापर, कारवाई मात्र शून्य...
डोंबिवली पूर्व मधील कावेरी चौकात राजरोजपणे फेरीवाले उघड्यावर गॅस सिलेंडरचा वापर करताना दिसतात. तसेच पावसाळ्यात उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री केली जात आहे. महापालिकेचे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते. वास्तविक महापालिका प्रशासनाच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाने कावेरी चौकात कारवाई करत नसल्याने येथील अनधिकृत फेरीवाल्यांमये महापालिकेची भिती राहिली नाही, असे सत्यवान म्हात्रे यांनी सांगितले.