वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
ना. गिरीश महाजन यांची मध्यस्थी
उरण : जेएनपीटी बंदरासाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवीन शेवा गाव बोकडविडा येथे स्थलांतरीत करण्यात आला आहे. पण, गेली ३७ वर्ष त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, पुनर्वसित नवीन शेवा गावाचे पुनर्वसन १९८७ साली बोकडविरा येथील सर्व्हे नं.११२ मध्ये एकूण क्षेत्रफळ ३३.६४ हेक्टर जमिनीमध्ये झालेले असताना ‘सिडको'कडून फक्त १० हेक्टर मध्ये नवीन शेवा गावाचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. तसेच उर्वरित जागा ‘सिडको'च्या ताब्यात असून ती जागा ग्रामस्थांना मिळावी म्हणून अनेकवेळा मोर्चा, आंदोलन, उपोषण केलेली आहेत. अनेक वेळा जेएनपीटी, सिडको, जिल्हाधिकारी-रायगड आणि तहसिलदार-उरण यांच्याकडे वांरवार पत्रव्यवहार करुनसुध्दा आजपर्यंत जागेचा ताबा मिळालेला नाही, माजी आमदार मनोहर भोईर यांनी विधानभवनामध्ये विनंती अर्ज समिती समोर सदरचा विषय घेतला होता. त्याही वेळेस जमिनीचा ताबा देण्यात यावा, असा विनंती अर्ज समिती अध्यक्षांनी केली होती. तरी सुध्दा ‘सिडको'ने त्याचे पालन केले नाही.
शेवटी नवीन शेवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामसुधारण मंडळ'चे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी ग्रामस्थांना घेऊन आझाद मैदान, मुंबई येथे ३ दिवस साखळी उपोषण केले. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन आणि चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. यानंतर १० जुलै रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेसाठी बोलविण्यात आले. त्यावेळी माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सोनल घरत, अध्यक्ष कमलाकर पाटील आणि शिष्टमंडळाने ना. गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी ना. गिरीश महाजन यांनी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना फोन लावून याविषयी मिटिंग लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विजय सिंघल यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्याशी सुध्दा सर्विस्तर चर्चा केली. त्यामुळे नवीन सेवा ग्रामस्थांचा साखळी उपोषण मागे घेतले.
यावेळी ‘ग्रामसुधारण मंडळ'चे सल्लागार चंद्रकांत घरत, पंडीत घरत, उपाध्यक्ष एल. जी. म्हात्रे, उपसरपंच रेखा म्हात्रे, महेश म्हात्रे, देवराम घरत, भुपेंद्र पाटील, निलेश घरत, मंगेश घरत, अमित भोईर, निहाल घरत, मयूर म्हात्रे, अशोक दरने, स्वराज ठाकूर, गणेश घरत, आतिश घरत, दर्शन घरत, रुपेश म्हात्रे, लहू पाटील, केतन पाटील, मितेश पाटील, मंगेश घरत, विशाल घरत, सागर घरत, पीयुष घरत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.