रेल्वे दुर्घटनेतील जखमी महिलेला शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांनी केली ५ लाख रुपयांची मदत 

नवी मुंबई  : बेलापूर येथे रेल्वे दुर्घटनेमध्ये पाय गमवावे लागलेल्या रोहिणी बाेटे या महिलेच्या उपचारासाठी शिवसेना नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांनी पाच लाख रूपयांची आर्थिक मदत केली आहे. किशोर पाटकर यांनी या अपघातग्रस्त कटुंबाला केलेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. जखमी रोहिणी बोटे यांच्या कुटुंबियांनी देखील पाटकर यांचे आभार मानले आहेत.

तळोजा येथे राहणाऱ्या रोहिणी बोटे यांना गत ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता बेलापूर रेल्वे स्थानकात चक्कर आल्याने त्या रेल्वे रूळावर पडल्या होत्या. यावेळी त्या लोकलच्या खाली आल्याने त्यांच्या पायाना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांचा एक पाय काढून टाकावा लागला असून दुसरा पाय वाचविण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत. या उपचारासाठी खूप खर्च येणार असल्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना मदत व्हावी अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही केली होती. जखमी रोहिणी घरकाम करत होती व पती हाऊसकिपींगमध्ये काम करत आहे. त्यांच्या घरची स्थिती खूपच नाजूक आहे. 

ही बाब शिवसेना नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांना समजल्यानंतर त्यांनी बोटे कुटुंबियांची भेट धेवून त्यांना धीर दिला. तसेच त्यांना उपचारासाठी ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्घटनेतील महिलेला मदत उपलब्ध करून दिल्याचे पाटकर यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही उपचारासाठी सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. रोहिणी बोटे यांच्या कुटुंबियांनी पाटकर यांचे आभार मानले आहेत.

छायाचित्रकार नंदू कुरणे यांच्या उपचारासाठी १ लाख रुपये मदत

नवी मुंबईमधील सुप्रसिद्ध छायाचित्रकार नंदू कुरणे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुरणे यांच्या उपचारासाठीही नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांनी एक लाख रुपये मदत दिली आहे. नवी मुंबई फोटोग्राफर्स असोसिएशन यांनीही पाटकर यांचे आभार मानले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ना. गिरीश महाजन यांची मध्यस्थी