एपीएमसी मसाला बाजारात समस्याच-समस्या

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मसाला बाजारपेठेत समस्यांनी बाजार मांडला असून, या समस्यांकडे एपीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एपीएमसी मसाला बाजारात खड्डे, जीर्ण मलनिस्सारण व्यवस्था, पाणी साचण्याच प्रकार, बेकायदा पार्किंग, यामुळे एपीएमसी मसाला बाजारपेठेत होणारी ग्राहकांची गर्दी अशा अनेक समस्यांचा पाढा एपीएमसी मसाला बाजारातील व्यापारी संघटनांनी एपीएमसी प्रशासनासमोर वाचला.

एपीएमसी मसाला बाजारातील नवी मुंबई मर्चंट चेंबरमधील व्यापारी प्रतिनिधीनी एपीएमसी प्रशासनाकडे बैठकीत एपीएमसी मसाला बाजारातील समस्या, तक्रारींचा पाढा वाचला. एपीएमसी मसाला बाजारातील रस्त्यांची स्थिती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. या रस्त्यांवर बरेच खड्डे आहेत. त्यामुळे साहित्याची वाहतुक करणे अत्यंत कठीण होते. परिणामी वाहतूकदार माल उचलण्यासाठी एपीएमसी मसाला बाजारात येण्यास नकार देत आहेत. याचा परिणाम एपीएमसी मसाला बाजारातील व्यवसायावर होत आहे. पाणी साचणे आणि गुदमरलेल्या ड्रेनेजमुळे व्यवसायात अडचणी येत असून, वारंवार वीज जात असल्याने इंटरनेट कनेक्शनमध्ये अडथळा येत आहे त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात खंड पडतो.

 एपीएमसी मसाला बाजारातील सर्व  मुतारी अस्वच्छ असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. रस्ते आणि ओट्यावरील पथदिवे बंद असल्याने रात्री मार्केट असुरक्षित आहे. बेकायदा वाहन पार्किंग मुळे वारंवार होणारी वाहतुक कोंडी तसेच धोकादायक मध्यवर्ती  सुविधा इमारतीचा रखडलेला पुनर्विकास आदी समस्यांची यादी  एपीएमसी मसाला बाजारातील व्यापाऱ्यांनी एपीएमसी प्रशासनासमोर वाचून दाखवली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घरांच्या सोडतीसाठी ‘सिडको'ला मिळाला मुहूर्त