वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मत्स्य व्यवसायाला धोका
मुंबई : नवी मुंबईतील दिवाळे-बेलापूर किनारपट्टीला विशेष महत्व आहे. दिवाळे-बेलापूर किनारपट्टी लगत स्थानिक कोळी बांधव मासेमारी करुन आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह भागवित असतात. परंतु, तळोजा एमआयडीसी अंतर्गत सुरु असलेले अंडर वॉटर सिव्हरेज पाईप लाईनचे काम सुरु आहे. त्यामुळे पाईप लाईन वाटे समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे नवी मुंबईसह आजुबाजुच्या खाडीकिनाऱ्यावर जलप्रदुषण होऊन त्याचा माशांवर विपरीत परिणाम होऊन मासे नष्ट होण्याची भिती आहे. यामुळे दिवाळे-बेलापूर येथील स्थानिक कोळी बांधवांच्या व्यवसायावर परिणार होऊन त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवू शकते. यासाठी अंडर वाटर सिव्हरेज पाईप लाईनची दिशा बदलणे आणि सांडपाणी शुध्दीकरण करुन सोडण्याकरिता संबंधितांना निर्देश देण्याची मागणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ३ जुलै रोजी विधानसभा अधिवेशनात केली.
तळोजा एमआयडीसी अंतर्गत सुरु असलेले अंडर वॉटर सिव्हरेज पाईप लाईनचे काम सुरु आहे. सदरचे काम खारघर पर्यंत आले असून संपूर्ण दिवाळे, बेलापूर यासह न्हावा, ठाणे, मोरावे, उरण या मार्गाने जात असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे. तसेच सदर पाईप लाईन मधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे जलप्रदुषण होऊन माश्यांवर विपरीत परिणाम होऊन मासे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळे-बेलापूर येथील स्थानिक कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे आमदार सौ, मंदाताई म्हात्रे यांनी पॉईंट ऑफ इन्फोर्मेशनद्वारे शासनाकडे अंडर वाटर सिव्हरेज पाईप लाईनची दिशा बदलणे आणि सांडपाणी शुध्दीकरण करुन सोडण्याकरिता संबंधितांना निर्देश देण्याची मागणी केली आहे.
जर सदर पाईप लाईन मधून सांडपाणी समुद्रात सोडले तर संपूर्ण कोकण किनारपट्टीतील मासेमारी धोक्यात येईल. ज्या कंपनी मार्फत पाईप लाईनचे काम चालू त्या कंपनीला त्वरित सदर पाणी इतरत्र ठिकाणी शुध्दीकरण करुन सोडण्याचे आदेश देण्यात यावे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, सदर मागणीच्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी सर्व संबंधित कंपनीचे अधिकारी आणि विधी मंडळातील सदस्यांची बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच कोकण किनारपट्टीतील कोळी बांधवांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असे सांगितले.