छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
‘फ्लेमिंगो'ला ड्रोनचा धोका?
नवी मुंबई : नवी मुंबईतील पाणथळ प्रदेशात विसावलेल्या पलेमिंगोचे छायाचित्रण करण्यासाठी ड्रोनचा वापर वाढत असल्याबाबतच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या गृह विभागाला सदर समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले.
यासंदर्भात ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. आम्ही उत्साही लोकांमध्ये पलमिंगो पक्ष्यांवर धोकादायकपणे ड्रोन नेव्हिगेट करण्याची वाढती क्रेझ (वेड) पाहिली आहे. विस्मयकारक सुंदर चित्रे आणि रील्स सोशल मिडीयावर फिरत आहेत. परंतु, ड्रोन पक्ष्यांसाठी धोकादायक असल्याची बाब वन्यजीव छायाचित्रकारांनी लक्षात घेतली पाहिजे, असे ‘नॅटकनेवट'ने म्हटले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ अंतर्गत समाविष्ट असलेले पलेमिंगो अतिशय संवेदनशील पक्षी असून त्यांना ड्रोनवरील ब्लेडने दुखापत होऊ शकते किंवा ते मारले जाऊ शकतात, असे बी. एन. कुमार यांनी नमूद केले.
‘नॅटकनेवट फाऊंडेशन'च्या तक्रारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन याप्रकरणी राज्याच्या अतिरिवत मुख्य सचिव (गृह) सुजाता सौनिक यांना सदर समस्येकडे लक्ष देण्यास आणि कारवाई करण्यास मुख्यमंत्री कार्यालयाने सूचित केले आहे. तर पोलिसांना आधीच सतर्क केले आहे, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले.
सिडको पर्यावरणीय आणि पर्यावरणीय समतोल या सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्ष करुन पाणथळ जमीन विकसित करण्यायोग्य जमीन पार्सल मानते. सदर मुद्दा मनुष्य विरुध्द वन्यजीव संघर्षाच्या पलिकडे गेला आहे. सदर सर्व तत्त्वांच्या विरुध्द कोणत्याही प्रकारे पैसे कमविण्याच्या मानवी लालसेबद्दल खंत वाटते.
-बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.
त्याहूनही चिंताजनक गोष्ट म्हणजे ड्रोन पक्षी उडत असतानाही त्यांचा जवळून पाठपुरावा करतात. ड्रोनमधून येणारा आवाजही घाबरुन उडणाऱ्या पक्ष्यांना त्रास देऊ शकतो आणि ते पक्ष्यांसाठी धोकादायक आहे.
-ज्योती नाडकर्णी, पक्षी निरीक्षक.
ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्यात भरतीच्या पाण्याची पातळी वाढल्यावर टीएस चाणक्य, एनआरआय आणि डीपीएस पलेमिंगो झोनमध्ये उतरणाऱ्या पक्ष्यांना ड्रोन त्रास देतात. अशाप्रकारे नवी मुंबईचे मोठे जलस्त्रोत ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्याच्या ओल्या जमिनी म्हणून काम करतात. आणखी एक धोका म्हणजे काही स्वार्थी, बदमाश मंडळी पलेमिंगो पक्ष्यांचा पाठलाग करण्यासाठी त्यांच्यावर दगडफेक करतात. एकदा पक्षी येथे उतरणे बंद केले की हीच मंडळी जलकुंभ आता पलेमिंगोचे निवासस्थान नाहीत आणि म्हणून सदर क्षेत्रे विकासासाठी खुली करा, असा दावा करु शकतात.
-नंदकुमार पवार, प्रमुख-सागरशवती.