मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास २६ मे पासून महाग

उरण : उरण तालुवयातील मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का ) या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात येत्या २६ मे पासून २५ रुपयांची वाढ होणार आहे. दरवर्षी पावसाळी हंगामासाठी मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास तिकिट दरवाढ केली जाते. यामुळे मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास दरवर्षी प्रमाणे यंदाही महागणार आहे.

दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात वाढ केली जाते. मागील वर्षीही पावसाळी हंगामात तिकिट दरात वाढ करण्यात आली होती. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्था तर्फे पावसाळी हंगामासाठी मोरा-भाऊचा धक्का प्रवासासाठी तिकिट दरात ८० रुपयांंवरुन १०५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हाफ तिकिट दरातही ३९ रुपयांवरुन ५३ रुपयांपर्यंत म्हणजे ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सदर तिकिट दरवाढ २६ मे पासून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती मोरा बंदर निरीक्षक नितीन कोळी  यांनी दिली.

दरवर्षी मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात इंधन दरवाढीचे कारण पुढे करत प्रत्येक पावसाळी हंगामात २० ते २५ रुपयांपर्यंत वाढ केली जाते. त्यानंतर वाढ करण्यात आलेली तिकीट दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवून, पावसाळी हंगामात पुन्हा तिकिट दरवाढ केली जाते. मात्र, २०२२ सालीच्या पावसाळी हंगामानंतर मोरा-भाऊचा धक्का दरम्यानच्या प्रवासासाठी सीजन तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे खाडीतील पलेमिंगोंच्या गुलाबी चादरीवर रवताचे डाग