ठाणे खाडीतील पलेमिंगोंच्या गुलाबी चादरीवर रवताचे डाग

वाशी : नेरुळ मधील डीपीएस येथील सिडको जेट्टीच्या नामफलकाला धडकून आजवर १०ते १२ पलेमिंगो पक्ष्यांचा जीव गेल्याची घटना घडल्या आहेत. त्यापाठोपाठ आता घाटकोपर खाडीत २० मे रोजी रात्री एमिरेटस्‌च्या विमानाला धडकून ४० पलेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरी भागात पलेमिंगोचे योग्य संरक्षण होत नसल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे खाडीत विविध जैवविविधता आढळत असल्याने या खाडीत देशी-परदेशी पक्षांची नेहमीच रेलचेल  असते. अशातच हिवाळ्याची चाहूल लागताच नवी मुंबईतील ठाणे खाडीत स्थलांतरीत पलेमिंगो पक्ष्यांची गुलाबी चादर पहावयास मिळते. मात्र, यंदाचे वर्ष पलेमिंगो पक्ष्यांसाठी मृत्युचा वर्ष ठरत चालले आहे. या अगोदर नेरुळ जेट्टी वरील ‘सिडको'च्या नामफलकाला धडकून १० ते १२ पलेमिंगोंचा जीव गेला असून ३ ते ४ पलेमिंगो जखमी झाले होते. तर २० मे रोजी रात्री घाटकोपर मध्ये एमिरेटस्‌ कंपनीच्या प्रवासी विमानाला धडकून ४० पलेमिंगोंचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी पलेमिंगोंचा मृत्यू झाल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शहराचे नियोजनकार आपत्ती इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्हाला ते सांगताना दुःख होत आहे की, सदरची एक आपत्ती होती जी घडण्याची वाट पाहत होती. पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानातील प्रवाशांवर काही परिणाम झाला असता, तर ती जागतिक पातळीवर हेडलाईन झाली असती. परंतु, ४० मूक पलेमिंगोंच्या मृत्युमुळे अधिकाऱ्यांना, विशेषतः शहरी नियोजकांना काही फरक पडत नाही. विमान पक्ष्यांशी कसे धडकले आणि पायलटला त्याच्या रडारवरील कळप लक्षात आला नाही का? असे मुद्दे तपासण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. - बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेक्ट फाऊंडेशन.


पलेमिंगो पक्ष्यांचा अपघात हृदयद्रावक आहे. देशातील शहरी भागातील एकमेव रामसर परिसर ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्यात असून सुमारे १ लाख पलेमिंगो उडत राहतात. मात्र, त्यांच्या संरक्षणासाठी योग्य पाऊले शासनाकडून उचलली जात नाहीत. - संदीप सरीन, नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्व्हेशन सोसायटी.

 पलेमिंगो अधिवासांमध्ये आणि आजुबाजुला पर्यावरणीय आणि पर्यावरणीय संतुलन काळजीपूर्वक राखले पाहिजे. अन्यथा अशा घटनांमध्ये अधिक वाढ होऊन पलेमिंगो पक्ष्यांचा विनाश होऊ शकतो. - नरेशचंद्र सिंग, पर्यावरण प्रेमी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण; अधिकारी एसी केबीनच्या गारव्यात