मोदी सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष - महेंद्र घरत

उरण ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार विरोधात देशातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आता होणारी लोकसभा निवडणूक हुकूमशाही विरुध्द लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी असल्याचे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा जनताच दाखवील, असा दावा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केला

मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक १६ एप्रिल रोजी उरण तालुवयातील शेलघर येथील समाज मंदिर हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महेंद्र घरत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, काँग्रेसचे पनवेल तालुका  काँग्रेस अध्यक्ष नंदराज मुंगाजी, रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, उरण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा घरत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते

राज्यात सुरु असलेल्या गलिच्छ राजकारण विरोधात ‘महाविकास आघाडी'ची लढाई सुरु आहे. देशात सुरु असलेली हुकूमशाही रोखण्यासाठी लोकसभा निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. महागाई, बेरोजगारीमुळे देशातील जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणूक म्हणजे जनतेच्या अस्तित्वाची  लढाई आहे. या लढाईत ‘इंडिया आघाडी'चे हात मजबूत करा. देशामध्ये शंभर टक्के बदल होईल, असेही महेंद्र घरत यांनी यावेळी स्पष्ट व्ोÀले.

देशातील जनता मोदी सरकार हटविण्यासाठी आता सज्ज झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा पराभव घडवून आणण्यासाठी निष्ठेने कामाला लागा, वेंÀद्रातील हुकूमशाही पध्दतीच्या राजवटीला उलथून टाकण्यासाठी ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन महेंद्र घरत यांनी कार्यकर्त्यांना केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वैशाली दरेकर यांच्या प्रचारात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड