कळंबोली वसाहतीला वाहतूक कोंडीचे  ग्रासले

नवीन पनवेल: कळंबोली वसाहत मधील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यापाऱ्यांच्या वाहनांची पार्किंग आणि शेकडो फेरीवाल्यांमुळे या भागातवाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणाहून पादचाऱ्यांना चालणे देखील मुश्किल होत आहे. परंतु, महापालिकेचे अतिक्रमण विभाग आणि प्रभाग अधिकारी सदर सर्व प्रकार पाठीशी घालताना दिसत आहेत.

कळंबोली वसाहत मधून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून करोडो रुपयांची रस्ते आणि गटारांची कामे सुरु आहेत. कळंबोली फायर ब्रिगेड ते पल्लवी अविदा हॉटेल रोडपाली या रस्त्याचे आणि गटाराची कामे सुरु असल्यामुळे एकेरी मार्गाने वाहतूक चालू आहे. त्यामुळे दोन्ही मार्गाचा भार एकाच मार्गावर येत असूनही केल-२ नाका ते पेट्रोल पंप या मार्गावर ४०० मीटर अंरावर जवळपास २०० अवैध फेरीवाले आपला व्यवसाय रस्त्यावर करत आहेत. तसेच एमजीएम हॉस्पिटल ते एसबीआय बँक या पट्ट्यामध्ये १५ भाजीपाल्याचे पिकअप, टेम्पो आणि आईस्क्रीमची गाडी विक्री करताना दिसत आहेत. एकेरी रस्त्यावर एका लेनवर चार चाकी वाहनांची पार्किंग, त्याच्यासमोर दुसऱ्या लेनवर फेरीवाले आणि दुचाकी-चारचाकी वाहनांद्वारे राजरोसपणे रस्त्यावर उभे राहून व्यवसाय व्ोÀला जात आहेत. एकेरी रस्त्यावर अवघी एक मार्गिका जाण्या-येण्यासाठी वापरावी लागत असल्याने ‘एनएमएमटी'ची बस वसाहतीमध्ये आल्यास संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा वादावादीचे प्रसंग देखील उद्‌भवलेले आहेत.
तसेच याच मार्गावरील केएल-२ सोसायटीचा रस्ताही अवैध फेरीवाल्यांनी अडवला असून सोसायटी मधील नागरिक महापालिका विरोधात उपोषणाच्या तयारीत आहेत.

परंतु, कळंबोलीमधील सदर मुख्य रस्त्यावरच फेरीवाले बसून सामान विकत असूनही महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांना मात्र ते का दिसत नाहीत? असा सवाल कळंबोलीकरांनी उपस्थित व्ोÀला आहे. 
वाहतूक पोलिसांची संशयास्पद भूमिका...

खरेतर या मार्गावरुन कॉलनी स्टॉप ते डी-मार्टच्या रस्त्यावर लागलेल्याठ राविक ठिकाणच्या दुचाकी कळंबोली वाहतूक चौकीची टोईंग व्हॉन, चारचाकी सोडून उचलून नेतात. परंतु, एकेरी मार्गावरील गाड्या ते उचलून नेत नाहीत किंवा त्यावर कारवाई करत नाहीत, असा कळंबोलीकर नागरिकांचा आरोप आहे.

केल-२ सोसायटीच्या चहोबाजू फेरीवाल्यांनी व्यापल्या आहेत. त्यामुळे सोसायटी मधील नागरिकांना या फेरीवाल्यांचा खूप ताप होत आहे. महापालिकेने सदर फेरीवाले तत्काळ हटवावेत, नाहीतर आम्ही सर्वजण महापालिका मुख्यालयासमोर उपोषणाला बसू.
-सतिश धायगुडे, रहिवासी, केएल-२ सोसायटी, कळंबोली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नैना विरोधात शेतकरी आक्रमक