जलद प्रवासासाठी ‘रिंग रोड' महत्वाचे -मुख्यमंत्री

ठाणे ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी ‘रिंग रोड'ची आवश्यकता लक्षात घ्ोऊन ‘एमएमआरडीए'ला डीपीआर तयार करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ऑनलाईन भूमीपुजन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रमेश पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

तुर्भे येथे वेश्या व्यवसाय ; शिवसेना तर्फे पोलीस ठाणेवर मोर्चा