वाशी बसथांब्याचा लवकरच कायापालट


नवी मुंबई ः सायन-पनवेल हायवे येथील वाशी प्लाझा येथील (वाशी हायवे) असलेल्या बस थांब्यावर गैरसोयीमुळे होणाऱ्या त्रासातून प्रवासी नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून ५० लाख रुपयांच्या निधीतून वाशी हायवे बसथांब्यांचा कालापालट व्ोÀला जाणार असून यासह प्रवाशांसाठी वेटींग रुम, सुलभ शौचालय, उद्यान, आदि सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
दुसरीकडे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सायन-पनवेल हायवेलगत इतर सोयी-सुविधांसाठी जवळपास २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
सदर कामांचे भूमीपुजन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, समाजसेवक पांडुरंग आमले, अशोक विधाते, विकास सोरटे, अशोक चटर्जी, रुपेश मढवी, शशी भानुशाली, प्रवीण भगत, प्रताप भोसकर, महेश दरेकर, आशाराम राजपूत, जयेश थोरवे, सुभाष गायकवाड, संगीता म्हात्रे, अलका म्हात्रे यांच्यासह शेकडो प्रवासी नागरिक उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शरद पवार यांनी घेतली कलानी कुटुंबियांची भेट