ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न' जाहीर

मुंबई :  ‘भाजपा'चे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारतरत्न असा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली. जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

दरम्यान, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन केले.
 

अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे आनंददायी बाब आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

प्रखर राष्ट्रभक्त अशा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी जी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे, असे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, ‘रथयात्रा'चे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे. उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी लालवृÀष्ण अडवाणी यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, असे अभिष्टचिंतन करुन मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्येष्ठ नेते अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल मध्ये उत्साहात संपन्न