नवी मुंबईकरांच्या हक्काच्या आरोग्य व्यवस्थेसाठी अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वात ‘स्वाक्षरी मोहीम'

नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस निर्धारित ‘स्वाक्षरी मोहीम' वाशी येथील नवी मुंबई महापालिका रुग्णालय समोर ‘महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस'चे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या हक्काच्या आरोग्य व्यवस्थेसाठी राबविण्यात आली.

नवी मुंबईतील ढिसाळ आरोग्य व्यवस्थामुळे नवी मुंबई शहरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये कुठल्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळत नाहीत. या विरोधात आवाज उठवण्यासाठी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस तर्फे ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून वाशी येथील महापालिका सार्वजनिक रुग्णालय समोर ‘स्वाक्षरी मोहीम' सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे स्वाक्षरी मोहीम सुरु होण्याआधीच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

स्वाक्षरी मोहिमेतून रुग्णालय प्रशासनाला आणि महापालिकेला थेट प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांमध्ये, कोविड महामारीत महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराला आपण सहन केलं पण आता सरकारी रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी कोणी अडवलं?, आणखी किती दिवस नवी मुंबईतील सरकारी रुग्णालयातून रुग्णांना खाजगी रुग्णालयांत धाडणार?, सर्वसामान्य नवी मुंबईकर हक्काच्या आरोग्य व्यवस्थेपासून आणखी किती दिवस वंचित राहणार?, सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व आरोग्य सेवा, ब्लड टेस्ट, ट्रीटमेंट का होत नाही?, ‘खाजगी हॉस्पिटल'चे मिंधे होऊन प्रशासन किती दिवस तोंड लपवणार?, प्रसूती आवश्यक काळात महिलांना बळे बळे प्रायव्हेट हॉस्पिटलला पाठवणारे प्रसाशन नेमके कोणासाठी? आणि टॅक्स भरताना उशीर झाल्यावर दंड ठोठावणारी महापालिका, सरकारी रुग्णालयातील लेट रुग्णसेवेवर मूग  घ्ऊन गप्प का?, या प्रश्नांचा समावेश होता, अशी माहिती अनिकेत म्हात्रे यांनी दिली.  

स्वाक्षरी मोहिमेच्या वेळी युवक काँग्रेस द्वारे उपस्थित सर्व प्रश्नांवरुन नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष दिसत होता. तब्बल ७५० पेक्षा अधिक लोकांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घs तला. नागरिकांच्या आरोग्याच्या मुद्यावरुन यापुढेही सतत आवाज उठवला जाणार असून, लवकरच नवी मुंबईकरांच्या हक्काच्या आरोग्य व्यवस्थेसाठी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरुन संघर्ष करणार आहे, असे यावेळी अनिकेत म्हात्रे यांनी जाहीर केले.

या स्वाक्षरी मोहिमेला ‘नवी मुंबई'चे माजी उपमहापौर अविनाश लाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते नासीर हुसैन,नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष पूनम पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस उज्वला सावळे, ‘नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस'चे प्रभारी दीप काकडे, ‘नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस'चे अध्यक्ष संदेश बनसोडे, सुनील किंद्रे, अभिषेक पाटील, सूरज देसाई, सिताराम शिरसाट, बाळकृष्ण बैले यांच्यासह युवक काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

७८४९ सिडको सोडतधारक कुटुंबांचे वाचले ४८० कोटी रुपये