आनंदी व समाधानी भूतान

भूतानची लोकसंख्या कमी, नऊ दहा लाखापर्यंत, पारंपारिक घराणेची राजेशाही तिथे असली तरी, जनता तिथला राजा ( King of Bhutan) जिग्या वांगचूकचा जनता खुप आदर करतात. प्रत्येक वास्तुत राजाचा फोटो हा एक आदरणीय म्हणून असतोच. तिथले राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय चिन्हामध्ये ड्रॅगनला खुप महत्व आहे. भूतान हा जगातील पहिला कार्बन निगेटिव्ह देश आहे. दरवर्षी अंदाजे साठ दशलक्ष कार्बन टन शोषून घेते. वाहतूकीचे नियम जनता आनंदाने पाळते.  तिथे सिग्नल यंत्रणा नाही.

एक आटपाट नगर आहे. तिथे राजा राज्य करतो. राजावर प्रजेचे खुप प्रेम आहे. प्रजा राजाचा खुप आदर करतो. राजा जनतेला सुखी समाधानी व आनंदी ठेवत असतो. असं आपण वाचतो पण असं असू शकत का? असा विचार येतो ना...पण हो...हे आटपाट नगर आहे भूतान.

अनेक संत, अनेक गुरू व साधूच्यां उपासनेने पवित्र पावन झालेल्या भूमीत आनंदी समाधानाने जनता जगत असलेल्या भूतान सारख्या शांत देश पाहण्याचा योग आला. भूतानचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथली रंगीबेरंगी ( मोनेस्ट्री)  मठ, देवळे,  इमारती तेथील प्रत्येक भिंत, खांब, तिकडच्या खिडक्या या संस्कृतीचे दर्शन घडवणारी व वास्तूकलेचे सुंदंर रूप आहे. आम्ही बागडोग्रा एअरपोर्टला उतरून बाय रोड  भूतानच्या सीमेला पायथ्याशी फुंटशोलिंगला आलो. तिथून आमचा भूतानच्या प्रवासाला सुरवात झाली. प्रथम एक सुदंर मोनेस्ट्रीचे दर्शन घेतले. आजूबाजूला रंगीत कारंजे होते आत गुरू पद्मसंभव यांनी भेट दिलेली जागा म्हणून ती भूमी पवित्र झालेली होती.

भूतानची लोकसंख्या कमी, नऊ दहा लाखापर्यंत, पारंपारिक घराणेची राजेशाही तिथे असली तरी, जनता तिथला राजा ( King of Bhutan) जिग्या वांगचूकचा जनता खुप आदर करतात. प्रत्येक वास्तुत राजाचा फोटो हा एक आदरणीय म्हणून असतोच. तिथले राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय चिन्हामध्ये ड्रॅगनला खुप महत्व आहे. भूतान हा जगातील पहिला कार्बन निगेटिव्ह देश आहे. दरवर्षी अंदाजे साठ दशलक्ष कार्बन टन शोषून घेते. वाहतूकीचे नियम जनता आनंदाने पाळते.  तिथे सिग्नल यंत्रणा नाही. पोलिस जनतेच्या रक्षणासाठी असतात. पांढरा रंगाच्या झेब्रा क्रॉसिंगनेच जनता रस्ता ओलंडते. जनतेसाठी गाड्या थांबतात. कोणीही आपली गाडी ओव्हरटेक करताना दिसत नाही. कोणीही हॉर्न वाजवत नाही. जर एखाद्या वाहनाला यु टर्न करायचे असेल तर तो सरळ गाडी चालवून जिथे रस्त्यावर सर्कल असेल तिथूनच टर्न करणार. गाडीचा स्पीडपण मय्राादित आहे. भूतानची जनता नियम ‘आमच्या भल्यासाठी' आहे ते आम्ही मनापासून पाळतो असे म्हणतात.

भूतानमध्ये महिला जास्त प्रमाणात काम करताना दिसतात त्यांना रात्रीचा प्रवास करताना असुरक्षित वाटत नाही. तिकडे जास्त प्रमाणात भात खाल्ला जातो. भात, डाळ, वरण, आमटी बरोबर खातात. दातशी म्हणजे ‘कॉटेज चिझ' गाईच्या दुधापासून बनवतात ते प्रत्येक भाजीत ते मिक्स करून वेगवेगळ्या भाज्या बनवतात.  अजून एक कडक चीज, याकच्या दुधापासून (harden chees) बनवतात त्याला च्युगो किंवा च्युरपी असेही म्हणतात. हा पदार्थ प्रत्येक दुकानात पुढे असा दोऱ्याने बांधून लटकवलेला असतो व सर्व साधारण ते चीज प्रवासात एक सहज एनर्जी म्हणून एनजॉय करत खातात.

आमचा संपूर्ण प्रवास हा डोंगरदरीतून होता. रस्ता अरूंद वळणं घेत जात असला तरी कुठेही भीती किवां असुरक्षित वाटत नव्हते. जसजसे उंचावर जात होता गारवा जाणवु लागला. दूरदूरची उंचावरील डोंगरातील बैठकी घरं, तिथले ढगाळी आकाश, संथ मंद वळणं करत कधीकधी ‘बटर टी' कधी ‘ब्लॅक टी' घेत थिम्पूला आलो. थिम्पुला महत्वाचे आकर्षण म्हणजे चहुबाजूने दिसणारा भव्यदिव्य बुद्धाचा हलका सोनेरी पुतळा. आम्ही तिथे सकाळी कोवळ्या उन्हात भेट दिली आजुबाजुच्या भव्य परिसराने आमचे डोळे दिपले. मोनेस्ट्रीच्या आत गेलो सुंदर मनोहर मनमोहक श्रवनीय अशी शांत प्रार्थना चालू होती. मन प्रसन्नतेने भरून आले. आतील संपूर्ण परिसर लहान लहान अनेक बुध्दाच्या अनेक मुर्तीनी भरून गेले होते.

तिथून आम्ही ‘सिपंली भूतान' ला भेट दिली. पारंपारिक पद्धतीची मोठमोठी पातेली, त्याच्या काही खास वस्तूचे प्रदर्शन होते ते पाहिले. भूतानमधील राष्ट्रीय खेळ म्हणजे तिरंदाजी. धनुष्याच्या बाणाने बरोबर नेम ठेवला तर ती लोकं आनंद व्यक्त करायला एक प्रकारचा सामुदायिक नाच करतात तेव्हा खुप मजा येते. आम्हीपण तिरंदाजी खेळून आनंद घेतला. भूतानमधील संगीत व नाच, शब्दचा अर्थ जरी कळत नव्हते तरी कानाला खुप मधुर वाटत होते व मुलं मुली राष्ट्रीय पारंपारिक वेष घालून हाताचे व पायाचे हलकेच स्टेप करत नाचत होते. पुढे आम्ही फोब्जिखाला अजून वर गेली तिथे उंचावर १०८ स्तूपाज विशिष्ट पद्धतीने बांधलेले होते तिथुन पुढे स्थलांतरीत पक्ष्यांचे संवर्धन करतात तिथे भेट घेतली. काळ्या मानेचे सिजनल क्रेन खुप येतात. त्याची विशिष्ठ पध्दतीने कशी काळजी घेतली जाते त्याची डोक्यूमेटंरी दाखवली.

पूढे पुढे आम्ही पुनाखाला आलो. तिथे मोनेस्ट्रीमध्ये भव्य असे तीन मोठे पुतळे होते मध्ये बुध्दाची मंदहास्य व हाताची विशिष्ट मुद्रा असलेली खुपच मोठी मुर्ती डावीकडेपण तेवढीच भव्य गुरू पद्मसंभवची वेगवेगळ्या भावना असलेली मूर्ती व उजवीकडे फाऊंडर ऑफ भूतानच्या गुरूचीं मूर्ती असते. प्रत्येक मूर्तीसमीर सात स्वच्छ पाणी भरलेली भांडी असतातच. प्रत्येक मोनेस्ट्रीच्या बाहेर लगेच संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा करतो तेव्हा तिथली एक प्रथा आहे तिथे ‘मंत्रा व्हिल' असते ते गोल गोल फिरवत, मनात एक विशिष्ट मंत्र म्हणत पुढे पुढे जात प्रदक्षिणा पूर्ण करत जायचे असते. भूतानला आम्ही ‘रिवर रापटीग' चा मस्त छान अनूभव घेतला. मग आम्ही पारोला आलो. तिथे टायगर नेस्ट मोनेस्ट्री प्रसिद्ध आहे. उंचावर जाणे व तिथे दर्शन घेत ध्यानधारणा करणे म्हणजे खुप भाग्याचे असते.

गुरू पद्मसंभव यांनी ती मोनेस्ट्री ध्यानधारणेने पावन केली आहे. पुढे आम्ही एक नॅशनल म्यूझियमला भेट दिली. काही मॉनेस्टीमध्ये दिवा लावायला मिळतात तेव्हा ते खुप भाग्याचं वाटते. तिकडचे मॉक आशीर्वाद देतात तेव्हा मन प्रसन्न होते. पारोहून खाली परत फुटशोटीगला आलो आणि  दुसरा दिवशी बागडोग्राहून एअरपोर्टहून मुंबईला भूतानचे सौंदय कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करत व सुंदर आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेऊन मुंबईला आलो. -सौ.पूर्णिमा आनंद शेंडे  (कोल्हापूरे) 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

काकडा ५ उठा जागे व्हा रे आतां!