छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
टाळ्या वाजवा नि आजाराला पळवा
टाळ्या वाजवण्याच्या आधी हाताला बदामाचे, देशी गाईचे तूप किंवा खोबरेल तेल लावावे. रोज सकाळी २०० व संध्याकाळी २०० टाळ्या वाजवाव्यात. २०० टाळ्या हात वर करून वाजवा व २०० टाळ्या सामान्यस्थितीमध्ये उभे राहून वाजवा. आपले पूर्वज हे ज्ञानी, हुशार होते. त्यांना माहित होते की, मनुष्य हा धर्माशी जोडलेले प्रत्येक काम नक्की करतो! म्हणून मग देवपूजेनंतर आरती करताना टाळ्या वाजवण्याची प्रथा सुरु झाली.
अनेकदा मंदिरामध्ये किंवा जिथे भजन आणि कीर्तन होतात तसेच कार्यक्रमादरम्यान तिथे टाळ्या वाजवल्या जातात. मंदिरात आरतीच्या वेळी आणि किर्तन, प्रवचनाच्या वेळी टाळ्या वाजवण्याची प्रथा शतकानुशतके जुनी आहे. असे मानले जाते की, भजन- कीर्तनात टाळ्या वाजवण्याची प्रथा भक्त प्रल्हादाने सुरु केली. कारण भक्त प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यपू यांनी त्याच्यावर संतप्त होऊन त्याच्या सर्व वाटा नष्ट केल्या होत्या. पण प्रल्हाद भगवतांच्या स्तोत्रात ताल येण्यासाठी टाळ्या वाजवू लागला. यानंतर इतर लोकही त्याच्याप्रमाणे भजन- कीर्तनात टाळ्या वाजवू लागले. आरती आणि कीर्तनात टाळ्या का वाजवतात, त्याचे कारण त्याकाळी माहिती नव्हते. तेव्हा भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घेतले.
हिंदू धर्मात मंदिरात पूजा, आरती, भजन, किर्तन यासाठी टाळ्या वाजवण्याची परंपरा शतकानुशतके फार जुनी आहे. कोठेही असली तरी टाळ्या या वाजतातच. टाळी वाजवल्याने पापांचा नाश होतो अशी यामागे श्रध्दा आहे. आणखी एक धारणा अशी आहे की, प्राचीन काळी सामान्य लोकांकडे आजच्यासारखी वाद्य नव्हती म्हणून भजन-कीर्तनात ताल देण्यासाठी टाळ्या वाजवणे हादेखील योगाचा प्रकार मानला जातो. नियमित टाळ्या वाजवल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाहही वाढीस लागतो.
हिंदू धर्मात कोणतीही गोष्ट वैज्ञानिक पुराव्याशिवाय घडत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती टाळ्या वाजवते तेव्हा तळहातामध्ये सुमारे ३० पेक्षा जास्त ॲक्युप्रेशर असणारे पॉईंट्स सक्रीय होतात. हे कंबर, मान, मूत्रपिंड, फुप्फुस, पोट इत्यादीसह विविध अवयवांना जोडतात. त्यामुळे अनेक अप्रत्यक्ष फायदे होतात. हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब पातळी राखली जाते. टाळ्या वाजवल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन रक्ताभिसरण सुधारते. सांधेदुखी व पाठदुखी कमी होण्यास मदत होते. टाळ्यांनी शरीरात एडोफिन (नैसर्गिक मूड बूस्टर) बाहेर पडतात. त्यामुळे वेदना कमी होऊन ताणतणाव राहत नाही. तसेच मनाची एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते. टाळ्या वाजवणे हे एक प्रभावी ध्यान आहे. ते आपल्याला शांत राहण्यास मदत करते. टाळ्या वाजवण्याचा वापर अनेकदा लोकांना ध्वनीमधील लय ओळखण्यास मदत करण्यासाठी केला जातो. संगीतकारांना ताल मोजण्यासाठी वापर होऊ शकतो. शब्द कसे बनवले जातात हे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ध्वनी विषयक जाणीव शिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. शब्दांना त्यांच्या घटक ध्वनीमध्ये विभाजित करण्यास शिकवण्यासाठी अनेकदा अक्षरे वाजवतात. विशेषतः लहान मुलांनापण टाळीद्वारे अंक शिकण्यास सोपे जाते.
रोज २०० ते ४०० टाळ्या वाजवल्याने गाऊट, आम्लवात बरा होतो. हाताचा तळवा किंवा हात थरथर कापणे हे सर्व सकाळ, संध्याकाळ टाळ्या वाजवून ५ ते ६ महिन्यात सुधारणा होते. रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो. अस्थमा, मधुमेह, डोकेदुखी नियंत्रणात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या केसासंबंधीचे विकार बरे होण्यास मदत होते. कारण हाताचा अंगठा व बोटांच्या शिरा-नसा या डोक्याशी जोडलेल्या असतात. वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होते. स्मरणशक्ती वाढते. शरीराचे सर्व जोडबिंदू हे हाताच्या बोटांशी जोडलेले असल्यामुळे टाळ्या वाजवल्याने शरीर स्वस्थ निरोगी राहते.
टाळ्या वाजवण्याच्या आधी हाताला बदामाचे, देशी गाईचे तूप किंवा खोबरेल तेल लावावे. रोज सकाळी २०० व संध्याकाळी २०० टाळ्या वाजवाव्यात. २०० टाळ्या हात वर करून वाजवा व २०० टाळ्या सामान्यस्थितीमध्ये उभे राहून वाजवा. आपले पूर्वज हे ज्ञानी, हुशार होते. त्यांना माहित होते की, मनुष्य हा धर्माशी जोडलेले प्रत्येक काम नक्की करतो! म्हणून मग देवपूजेनंतर आरती करताना टाळ्या वाजवण्याची प्रथा सुरु झाली. टाळ्या वाजवताना, दोन्ही हातांच्या तळव्यांनी एकमेकांना जोराने वाजवतात. यामुळे हाताच्या तळव्यावरील विशिष्ट बिंदूवर दाब येतो आणि त्याचे फायदे मिळतात. टाळ्या वाजवण्याची सकाळची वेळ चांगली मानली जाते. त्यामुळे दिवसाची सुरुवात उत्साहाने होते आणि शरीराला ऊर्जा चक्रांना सक्रीय करते. टाळ्या वाजवणे हे आनंद व उत्साहाचे प्रतिक असल्यामुळे कोणत्याही शुभ आणि आनंददायी प्रसंगी हमखास टाळ्यांचा कडकडाट होत असतो. एकप्रकारे तेथे उत्साहपूर्ण लहरी तयार होऊन वातावरण आनंदामयी होऊन त्याचा लाभ अप्रत्यक्ष सगळ्यांना मिळतो. - लीना बल्लाळ