वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
विवेकानंद प्राथमिक विद्यालय, सानपाडा येथे वृक्षारोपणाबरोबरच त्यांची निगा राखण्याचे संस्कार
नवी मुंबई : सानपाडा येथील विवेकानंद प्राथमिक विद्यालयामधील इ १ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त आपल्या आईच्या/माऊलीच्या नावाचे एक फुलाचे किंवा फळाचे झाड आपल्या सोसायटी आवारात, मोकळ्या जागी, घराजवळ किंवा अगदीच कुठेही नाही तर घरातील मोठ्या कुंडीत लावत त्याची निगा आणि संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली.
आपली आई जशी आपली काळजी घेते त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनी ते झाड जपण्याची ग्वाही दिली. तसेच त्या झाडाला आलेले पहिले फळ/फूल हे आपल्या माऊलीला अर्पण करणार असा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. आताच्या पिढीवर निसर्ग संगोपन व पर्यावरण संवर्धन करण्याचे संस्कार करणे हा यामागील उद्देश होता. आपण मुलांना निसर्गाप्रति संवेदनशील बनवले नाही तर यापुढे अगदी साधी दगडफूलासारखी वनस्पतीही भविष्यात फक्त चित्रात दाखवावी लागेल. पर्यावरणाच्या असमतोलामुळे व बेछूट होणा-या वृक्षतोडीमुळे ह्यावर्षीचा उष्मा आपण सर्वांनी सोसला आहे, ह्याकरिता आपण सुजाण शिक्षक व पालक म्हणून संस्कारक्षम व संवेदनशील पाल्य व विद्यार्थी घडविण्याकरिता हा उपक्रम आणि हे वृक्ष संगोपनाचा, संवर्धनाचे व्रत मनापासून करावे असे आवाहन यावेळी मुख्याध्यापिका सौ रेश्मा देशपांडे ह्यांनी पालक व विद्यार्थ्यांना केले. शााळेतील सर्व शिक्षकवृंदानेही ह्या उपक्रमात सहभाग घेतला. शाळेच्या आवारात यावेळी बकुळ वृक्षाचे व १० फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.